पतंजलीने आमच्याकडे तर फक्त ताप-खोकल्यावरील औषधाचा परवाना मागितला : उत्तराखंड आयुर्वेद विभाग
उत्तराखंड आयुर्वेद विभागाने नोटीस जारी करत पतंजलीलाला औषध लॉन्च करण्याची परवानगी कोणी दिली, असा सवाल उपस्थित केला आहे.
देहरादून : कोरोनावरील औषध ‘कोरोनिल’ बनवल्याचा दावा (Uttarakhand Ayurveda Department Notice To Patanjali) करणाऱ्या पंतजलीच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे. राजस्थान सरकारने योग गुरु बाबा रामदेवविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे. तर आता उत्तराखंड सरकारनेही पतंजलीला नोटीस पाठवण्याची तयारी केली आहे. उत्तराखंड आयुर्वेद विभागाने नोटीस जारी करत पतंजलीलाला औषध लॉन्च करण्याची परवानगी कोणी दिली, असा सवाल उपस्थित केला आहे (Uttarakhand Ayurveda Department Notice To Patanjali).
“पतंजलीच्या आवेदनावर आम्ही परवाना जारी केला. या आवेदनात कुठेही कोरोना विषाणूचा उल्लेख नव्हता. यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, कफ आणि तापाचं औषध बनवण्यासाठी परवाना घेत असल्याचं म्हटलं आहे”, अशी माहिती उत्तराखंड आयुर्वेद विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणी पतंजलीला नोटीस पाठवण्यात आल्याचंही अधिकाऱ्याने सांगितलं.
पतंजलीचा दावा खोटा : राजस्थान सरकार
यापूर्वी राजस्थान सरकारने रामदेव बाबाच्या कोरोनावरील कोरोनिल औषधाचा दावा खोटा असल्याचं सांगितलं होतं. ‘अशा परिस्थितीत बाबा रामदेव अशा प्रकारे कोरोनावरील औषध विकण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते चुकीचं आहे’, असं राजस्थान सरकारचे आरोग्य मंत्री रघु शर्मा यांनी सांगितलं (Uttarakhand Ayurveda Department Notice To Patanjali).
“आयुष मंत्रालयाच्या नोटिफिकेशननुसार, बाबा रामदेव यांनी आयसीएमआर आणि राजस्थान सरकारकडून कोरोनाच्या आयुर्वेद औषधाच्या चाचणीसाठी परवानगी घ्यायला हवी होती. मात्र, विना परवानगी आणि कोणत्याही निकषाशिवाय चाचणीचा दावा केला गेला”, हे चुकीचं आहे, असं रघु शर्मा यांनी सांगितलं.
तसेच, केंद्रीय आयुष मंत्रालयानेही पतंजलीला नोटीस बजावली आहे. बाबा रामदेवने मंत्रालयाच्या परवानगीशिवाय प्रसारमाध्यमांमध्ये या औषधचा दावा करायला नको होता. याप्रकरणी आयुष मंत्रालयाने बाबा रामदेवला जबाब विचारला आहे, असं केंद्रीय आयुष मंत्री श्रीपद नाईक यांनी ‘आज तक’ला सांगितलं.
कोरोनावरील औषध बनवलं, बाबा रामदेव यांचा दावा
पतंजलीने कोरोनासाठी औषध तयार केली आहे. याला कोरोनिल असं नाव देण्यात आलं आहे, असा दावा काल (23 जून) बाबा रामदेव यांनी केला होता. बाबा रामदेव यांच्या या दाव्यावर आयुष मंत्रालयाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, विना परवानगी रामदेव बाबा या औषधाची विक्री करु शकत नाही.
पतंजलीकडून कोरोनावरील Coronil औषध लाँच, 7 दिवसात रुग्ण बरा होण्याचा दावाhttps://t.co/XaLIvBqTzv#RamdevBaba #Patanjali #CoronaMedicine #Coronil
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 23, 2020
Uttarakhand Ayurveda Department Notice To Patanjali
संबंधित बातम्या :