पोलीस असल्याची बतावणी करून प्रवाशांची लूट; 55 हजारांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

पोलीस असल्याची बतावणी करून मुंबई-अहमदाबाद महामार्गावर प्रवाशांना लूटणाऱ्या टोळीचा वालीव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. वसई परिसरात रस्त्यावरील वाहन थांबवून ही टोळी प्रवाशांची लूटमार करत होती.

पोलीस असल्याची बतावणी करून प्रवाशांची लूट; 55 हजारांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक
Follow us
| Updated on: Nov 17, 2020 | 4:03 PM

पालघर : पोलीस असल्याची बतावणी करून मुंबई-अहमदाबाद महामार्गावर प्रवाशांना लूटणाऱ्या टोळीचा वालीव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. वसई परिसरात रस्त्यावरील वाहन थांबवून ही टोळी प्रवाशांची लूटमार करत होती. घटनेचा सुगावा लागताच वालीव पोलिसांनी या टोळीला जेरबंद केलं. (Valiv police arrested gang looting passengers)

पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक करुन, त्यांच्याकडून 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. श्याम राठोड (35), विनोद दवे (41), रामेश्वर चव्हाण (31) अशी आरोपींची नावं आहेत. हे तिन्ही आरोपी वसईच्या गोखीवरे भागातील रहिवाशी असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून मुंबई-अहमदाबाद महामार्गावर प्रवाशांना अडवून लूटमार करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यानंतर रणजित यादव यांना याच मार्गावर अडवून त्यांच्याकडून रोख रक्कम पळवल्याचा गुन्हा वालीव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी तपास सुरु केला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या प्रकरणाची उकल करण्यासाठी एक स्वतंत्र पथक तयार केले.

स्वतंत्र पथकाने या प्रकरणाचा तपास सुरु केल्यानंतर त्यांना मिळालेली माहिती आणि पुराव्यांच्या आधारे त्यांनी शाम, विनोद, रामेश्वर यांना अटक केली. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर वालीव पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली. चौकशीअंती त्यांनी वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 गंभीर स्वरुपाचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

दरम्यान, वालीव पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून 55 हजार रुपये किमतीची दुचाकी, मोबाईल, आणि काही रोख रक्कम जप्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अटक केलेले तिन्ही आरोपी इतरही गुन्ह्यांत सामील असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, त्यांच्याकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे वालीव पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. (Valiv police arrested gang looting passengers)

संबंधित बातम्या :

आजीच्या डोळ्यांदेखत रुग्णालयातून बाळाला पळवून नेलं; सीसीटीव्ही फुटेजच्याआधारे पोलिसांचा शोध सुरु

मित्राच्या पार्टीत ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध; बेशुद्ध झाल्यानंतर महिलेवर सामूहिक बलात्कार

रात्री साडेबारा वाजता दार ठोठावलं म्हणून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, डोंबिवलीतील धक्कादायक घटना

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.