उद्धव ठाकरे यांच्या त्या मागणीवर काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्याकडून चिंता, प्रकाश आंबेडकर यांचा गौप्यस्फोट, काय घडतंय पडद्यामागे ?
लोकसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहे. येत्या आठवड्यातच निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता असून, त्याच पार्श्वभूमीवर सर्व पक्षांचीही जोदरा तयारी सुरू आहे. एकीकडे महायुतीचं सरकार जागावाटपाबाबत चर्चा करत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीचं जागांचं त्रांगडं काही अद्याप काही सुटलेलं नाही. त्यांच्या रोजच्या बैठका, चर्चा होत असल्या तरी अद्याप जागावाटपाचं गणित स्पष्ट झालेलं नाही.
मुंबई | 12 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहे. येत्या आठवड्यातच निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता असून, त्याच पार्श्वभूमीवर सर्व पक्षांचीही जोदरा तयारी सुरू आहे. एकीकडे महायुतीचं सरकार जागावाटपाबाबत चर्चा करत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीचं जागांचं त्रांगडं काही अद्याप काही सुटलेलं नाही. त्यांच्या रोजच्या बैठका, चर्चा होत असल्या तरी अद्याप जागावाटपाचं गणित स्पष्ट झालेलं नाही.
याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहीलं आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात आळशीपणा सुरू आहे, असं त्यांनी लिहीलेल्या पत्रात नमूद केलं आहे. मविआच्या जागावाटपामध्ये विलंब होत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. मविआमध्ये १५ जागांवरून वाद आहे, त्यामुळे जागावाटप रखडतयं असं आंबेडकरांचं म्हणणं आहे. तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाने ज्या जागा मागितल्या आहेत, त्या संदर्भात काँग्रेसच्या मोठ्या नेत्याकडूनही चिंता व्यक्त करण्यात आली आहे, असा उल्लेखही प्रकाश आंबेडकर यांनी या पत्रात केला आहे. त्यांनी स्वत: या संदर्भात ट्विट केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहीलं आहे. त्यांनी नेमकं पत्रात काय लिहीलंय ते जाणून घेऊया.
पुढच्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांची तारीख जाहीर होऊ शकते. परंतू जागावाटपाच्या संदर्भात आळशीपणा हा मविआमधे आहे. महाविकास आघाडी मधे जागावाटपाच्या संदर्भात विलंब होत आहे. मविआमधे १५ लोकसभेच्या जागांच्या संदर्भात वाद आहे त्यामुळे जागावाटपाची चर्चा ही रखडत चलली आहे, असं त्यांनी नमूद केलं आहे.
I wrote a letter to Shri Mallikarjun Kharge on March 10, wherein I highlighted the telephonic conversation between Shri Ramesh Chennithala and I.
Taking into account the time left for elections, the lack of concurrence between INC and SS (UBT), and no finalisation of… pic.twitter.com/eYS1T3NgXe
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) March 12, 2024
उद्धव ठाकरे यांच्या त्या मागणीवर काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्याकडून चिंता
शिवसेना उद्धव ठाकरे गटाने ज्या जागा मागितल्या आहेत, त्या संदर्भात काँग्रेसकडूनही चिंता व्यक्त करण्यात आली आहे, असा उल्लेखही प्रकाश आंबेडकर यांनी या पत्रात केला आहे. ठाकरे गटाला आत्ताच्या त्यांच्या सर्व जागा हव्या आहेत, ते जागांच्या मागणीवर ठाम आहेत, त्यामुळे यावर काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांनी फोनवरून चर्चा करताना चिंता व्यक्त केली , असे आंबेडकर यांनी पत्रात नमूद केले आहे.
रमेश चेन्नीथला यांच्याशी फोनवरून या सगळ्या जागावाटपाच्या संदर्भात चर्चा करत असताना बोललो की,काँग्रेस आणि वंचित यांना संघाला हरवायचं आहे त्यामुळे आपण जागावाटपाची चर्चा लवकर करुन घेऊ असा प्रस्ताव मी रमेश चेन्नीथला यांना ठेवला. तेव्हा त्यांनी या संदर्भात आमचे नेते बाळासाहेब थोरात हे तुमच्याशी चर्चेला येत असे बोलले. पण अजून पर्यंत बाळासाहेब थोरात हे चर्चेला आलेले नाहीत, अशी खंत त्यांनी या पत्रात मांडली आहे. त्यामुळे यासंदर्भात ची माहिती देण्यासाठी मी हे पत्र आपल्याला लिहीलं आहे, असंही आंबेडकर यांनी नमूद केलं.