देशातल्या सर्वात वेगवान ट्रेनने प्रवास करण्यासाठी तिकीट किती?
नवी दिल्ली : देशातली पहिली विना इंजिन ट्रेन प्रवाशांच्या सेवेत येण्यासाठी सज्ज आहे. दिल्ली आणि वाराणसी या दरम्यान प्रवास करण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेस म्हणजेच ट्रेन 18 चं तिकीट 1850 रुपये आणि एक्जिक्यटीव्ह क्लाससाठी 3520 रुपये असेल. यामध्ये खानपान सेवा शुल्काचाही समावेश आहे. रेल्वेच्या माहितीनुसार रिटर्न प्रवासासाठी चेअर कार (सीसी) 1795 रुपये आणि एक्जिक्युटीव्ह क्लाससाठी (ईसी) […]
नवी दिल्ली : देशातली पहिली विना इंजिन ट्रेन प्रवाशांच्या सेवेत येण्यासाठी सज्ज आहे. दिल्ली आणि वाराणसी या दरम्यान प्रवास करण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेस म्हणजेच ट्रेन 18 चं तिकीट 1850 रुपये आणि एक्जिक्यटीव्ह क्लाससाठी 3520 रुपये असेल. यामध्ये खानपान सेवा शुल्काचाही समावेश आहे. रेल्वेच्या माहितीनुसार रिटर्न प्रवासासाठी चेअर कार (सीसी) 1795 रुपये आणि एक्जिक्युटीव्ह क्लाससाठी (ईसी) 3470 रुपये मोजावे लागतील.
अधिकृत सूत्रांच्या मते, एवढ्याच अंतरासाठी शताब्दी ट्रेनच्या तुलनेत या ट्रेनचं तिकीट दीडपट अधिक आहे. प्रीमियम ट्रेनमध्ये वाताणुकूलित प्रथम श्रेणीच्या तिकिटाच्या तुलनेत ईसीचं तिकीट 1.4 टक्के अधिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 फेब्रुवारी रोजी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील.
दिल्ली आणि कानपूर (447 किमी किमी) या दरम्यान चेअर कारचं भाडं 1150 रुपये आणि ईसी साठी 2245 रुपये मोजावे लागतील. तर दिल्ली आणि प्रयागराज (642 किमी) या प्रवासासाठी सीसी आणि ईसीचं भाडं अनुक्रमे 1480 रुपेय आणि 2935 रुपये असेल.
अधिकाऱ्यांच्या मते, कानपूर आणि प्रयागराज (195 किमी) या प्रवासासाठी सीसी आणि ईसीसाठी अनुक्रमे 630 रुपये आणि 1245 रुपये मोजावे लागतील. तर कानपूर ते वाराणसी या 319 किमी अंतरासाठी सीसी आणि ईसीसाठी भाडं अनुक्रमे 1065 रुपये आणि 1925 रुपये आहे.
ईसी आणि सीसी या दोन्ही श्रेणींमध्ये जेवणाची किंमत वेगवेगळी आहे. नवी दिल्ली ते वाराणसी जाणाऱ्या प्रवाशांसाठी ईसी श्रेणीत सकाळी चहा, नाष्टा आणि जेवणासाठी 399 रुपये द्यावे लागतील. तर सीसीच्या प्रवाशांना या सगळ्यासाठी 344 रुपये द्यावे लागतील.
नवी दिल्ली ते कानपूर आणि प्रयागराज प्रवास करणाऱ्यांना सीसी आणि ईसीसाठी अनुक्रमे 155 रुपये आणि 122 रुपये द्यावे लागतील. वाराणसी ते नवी दिल्ली येणारांना सीसी आणि ईसीसाठी अनुक्रमे 349 रुपये आणि 288 रुपये दर आकारला जाईल.
ट्रेन 18 एक्स्प्रेसचं नाव वंदे भारत एक्स्प्रेस असं करण्यात आलं आहे. संपूर्ण वातानुकूलित आणि हायटेक अशी ही पहिलीच विना इंजिन धावणारी ट्रेन आहे. दिल्ली आणि वाराणसी प्रवासासाठी या ट्रेनला आठ तासांचा कालावधी लागेल. या संपूर्ण प्रवासामध्ये ही ट्रेन फक्त कानपूर आणि प्रयागराज (अलाहाबाद) या दोन स्टेशनवर थांबणार आहे.