चंद्रपूर, भंडारा, गडचिरोलीत पूर, गोसेखुर्द धरणातून विसर्ग कमी करणार, विजय वडेट्टीवारांची माहिती
राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या दोन चमू ब्रह्मपुरीत दाखल होत आहेत. तर गोसेखुर्द धरणातून विसर्ग कमी केला जाणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीच्या दहा गावांमधील पूरस्थिती भीषण झाली आहे (Vidarbha Flood Update). जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे स्वतः ब्रम्हपुरीत पोहोचले आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या दोन चमू ब्रह्मपुरीत दाखल होत आहेत. तर गोसेखुर्द धरणातून विसर्ग कमी केला जाणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे (Vidarbha Flood Update).
तर उद्या दुपारनंतर परिस्थिती आटोक्यात येणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. आजची रात्र मात्र लाडज या गावासह अन्य 10 गावांसाठी संकटाची आहे. प्रशासनाने वैनगंगा नदीकाठच्या सर्वच गावांना रात्रभर सतर्कतेचा इशारा दिला आहे.
भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्याला पुराचा फटका
गोसेखुर्द धरणातुन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने याचा फटका भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्याला बसला आहे. गोसेखुर्द धरणाच्या पाण्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे (Vidarbha Flood Update).
भंडारा जिल्ह्यातील अनेक भागात पाणी शिरले आहे. मुख्य बाजारपेठ समजली जाणारी बाजारवाडी एका नदीच्या रुपात स्थांलनतर झाली आहे. हजारो शेकऱ्यांची पीकं नष्ट झाली, तर लाखो रुपयांचा भाजीपाला व्यापाऱ्यांनी पुराच्या पाण्यात सोडला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, दिना, कठाणी या नद्यांना पूर आला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दहा मार्ग बंद असून देसाईगंज आणि आरमोरी या दोन तालुक्यातून 360 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात प्रशासनाला यश आले आहेत. पण, गोसेखुर्द धरणातून रात्री आठ वाजताही 30,598 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असल्याने वडसा, आरमोरी, अहेरी, सिरोंचा या तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सर्तकेतेचा इशारा जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांनी दिला आहे.
Gosekhurd Dam | गोसेखुर्द धरणातून इतिहासातील सर्वाधिक विसर्ग, नदीकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशाराhttps://t.co/docBCkSKCp#GosekhurdDam
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 29, 2020
Vidarbha Flood Update
संबंधित बातम्या :
Maharashtra Rain | राज्यात दमदार पावसाने खडकवासलासह अनेक धरणं भरली, कोणत्या धरणात किती पाणीसाठा?