VIDEO : शेतकरी नोकर नाही, मालक! शरद पवारांची परभणीच्या युवकाशी दिलखुलास चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सामान्यातील सामान्य माणसासोबतही आपुलकीने संवाद करण्यासाठी ओळखले जातात. याच साधेपणाचा अनुभव परभणीच्या एका तरुणाला आला.

VIDEO : शेतकरी नोकर नाही, मालक! शरद पवारांची परभणीच्या युवकाशी दिलखुलास चर्चा
Follow us
| Updated on: Feb 08, 2020 | 7:18 AM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सामान्यातील सामान्य माणसासोबतही आपुलकीने संवाद करण्यासाठी ओळखले जातात. सहज उपलब्ध होणं आणि संवाद साधणं यामुळेच ज्येष्ठांसोबतच तरुणांमध्येही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या याच साधेपणाचा अनुभव परभणीच्या एका तरुणाला आला (Conversation of Sharad Pawar with youngster). दिल्ली ते पुणे विमान प्रवासादरम्यान शेजारच्या सीटवर बसलेल्या तरुणाशी बोलतानाचा व्हिडीओ सोशली मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. यात शरद पवार या तरुणाला काही माहिती देताना दिसत आहेत.

सामान्यपणे कोणताही राजकीय नेता आपलं विशेषत्व आबाधित ठेवण्यासाठी सहसा कुणाला सहज भेटत नाही किंवा बोलत नाही. ते नेहमीच सामान्यांपासून वेगळेपण जपतात. मात्र, शरद पवार याला अपवाद आहेत. त्यांचा हाच अपवादात्मक स्वभाव दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरतो आहे. या व्हिडीओमध्ये शरद पवार आपल्या शेजारी बसलेल्या एका तरुणाला विमानातून चाकणचा भाग दाखवत आहेत. तसेच तेथील उद्योगधंद्यांची माहिती देत आहेत.

तरुणाकडून मगरपट्ट्याचा उल्लेख होताच, तेथील शेतकरीच तेथील उद्योगांचा मालक असल्याचं शरद पवार तरुणाला सांगतात. तसेच या ठिकाणच्या तरुणांना सोबत घेऊन कसं काम केलं याचीही माहिती शरद पवार देतात. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. यावेळी ते म्हणाले, “विमानात तरुणाशी संवाद साधणारा शरद पवार यांचा व्हिडीओ पाहिला. यात शरद पवार चालतं बोलतं विद्यापीठच! या विद्यापीठातून कोणीच रिकाम्या हातानं जात नाही. समाजातील प्रत्येक घटकाशी संवाद साधत विचारांची देवाणघेवाण करणारा त्यांचा हा स्वभाव आम्हा सर्वांसाठीच आदर्श आहे!”

Conversation of Sharad Pawar with youngster

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.