VIDEO : बाईकला बांधलेल्या पिशवीला आग, 4 किमी बर्निंग बाईकचा थरार
लखनऊ : उत्तर प्रदेश पोलिसांच्या सतर्कतेमुळे लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस-वेवर एक मोठी दुर्घटना टळली आहे. इटावाजवळील एक्स्प्रेस-वेवर उत्तर प्रदेशच्या डायल 100 पथकाची एका बाईकवर नजर पडली. या बाईकच्या मागे लटकवण्यात आलेल्या पिशवीमध्ये आग लागली होती. हे लक्षात येताच पोलिसांनी त्या बाईकस्वार दाम्पत्याला आवाज दिला. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. बाईक अत्यंत वेगात असल्याने ती आग वाढत होती. […]
लखनऊ : उत्तर प्रदेश पोलिसांच्या सतर्कतेमुळे लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस-वेवर एक मोठी दुर्घटना टळली आहे. इटावाजवळील एक्स्प्रेस-वेवर उत्तर प्रदेशच्या डायल 100 पथकाची एका बाईकवर नजर पडली. या बाईकच्या मागे लटकवण्यात आलेल्या पिशवीमध्ये आग लागली होती. हे लक्षात येताच पोलिसांनी त्या बाईकस्वार दाम्पत्याला आवाज दिला. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. बाईक अत्यंत वेगात असल्याने ती आग वाढत होती. त्यामुळे पोलिसांनी या बाईकचा चार किलोमीटरपर्यंत पाठलाग करुन बाईकवर असलेल्या दाम्पत्याचा जीव वाचवला.
#इटावा-PRV1617 आज 108 km से 112 की तरफ जा रही थी तभी एक बाइक सवार ने तेजी से क्रॉस किया जिसके पीछे बंधे बैग में आग लगी दिखाई दी जो तेजी से बढ़ रही थी,बिना कोई देर किए उस बाइक का 4 km पीछाकर रुकवा,बाइक सवार दंपत्ति को नीचे उतारकर आग बुझाया @Uppolice @UPGovt #SaveLife #HappyToServe pic.twitter.com/T2d6JiVGk7
— UP100 (@up100) April 14, 2019
चार किलोमीटरपर्यंत पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी गाडीला आग लागल्याची माहिती बाईकस्वाराला दिली. त्यानंतर बाईकस्वाराने तातडीने गाडी थांबवली. पोलिसांनी ज्या पिशव्यांना आग लागली होती त्या पिशव्या बाजूला केल्या आणि आग विझवली. त्यामुळे एक मोठा अपघात होता होता टळला.
या घटनेचा व्हिडीओ उत्तर प्रदेश पोलिसांनी ट्विटरवर शेअर केला. या व्हिडीओमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांची सतर्कता आणि कर्तव्यनिष्ठा दिसून येत आहे. “इटावा-PRV1617 आज 108 किलोमीटरच्या वेगाने 112 च्या दिशेने जात होती. तेव्हाच एक बाईक अतिशय वेगाने तिथून गेली. त्या बाईकच्या मागे बांधलेल्या पिशव्यांना आग लागलेली आमच्या लक्षात आलं. त्यानंतर तातडीने आम्ही त्या बाईकचा चार किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. बाईकला थांबवलं, बाईकवरील दाम्पत्याला खाली उतरवलं आणि आग विझवली”, असं ट्वीट उत्तर प्रदेश पोलिसांनी केलं.
या बाईकवर पती-पत्नीसोबत त्यांचा लहान मुलगाही होता. जर वेळेवर बाईला आग लागल्याची सूचना मिळाली नसती, तर एखादा मोठी दुर्घटना घडू शकली असती. बाईकवर लागलेल्या पिशव्या आणि रस्त्यामध्ये घर्षण झाल्याने ही आग लागली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र, कुठल्याही प्रकारची दुर्घटना न घडल्याने पोलिसांनी समाधान व्यक्त केलं आहे.
साधुवाद @up100 आपके इसी साहस व कर्तव्यपरायणता के सतत दर्शन हों, ईश्वर से कामना है ! जय हिंद ??? @Uppolice @myogiadityanath https://t.co/p7EEKu5npb
— Dr Kumar Vishvas (@DrKumarVishwas) April 15, 2019
उत्तर प्रदेश पोलिसांनी शेअर केलेला व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत 30 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ बघितला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे. आपचे माजी नेते कुमार विश्वास यांनींही उत्तर प्रदेश पोलिसांचं कौतुक करत ट्वीट केलं आहे.