विदर्भात थंडीचा कडाका, गेल्या 24 तासात तापमानात घसरण, रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद
विशेष म्हणजे गेल्या 24 तासात विदर्भातील तापमानात साडेतीन अंशाने घसरण झाली आहे. (Vidharbha coldest winter season record)
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून विदर्भात थंडीचा कडाका वाढला आहे. विदर्भातील सर्वच शहरांचे तापमान हे 12 अंश सेल्सिअसवर घसरलं आहे. त्यामुळे यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या 24 तासात विदर्भातील तापमानात साडेतीन अंशाने घसरण झाली आहे. (Vidharbha coldest winter season record)
गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशासह उत्तर भारतातील अनेक भागात बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे त्या ठिकाणाहून येणारे वारे हे विदर्भाच्या दिशेने येत आहे. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. तसेच येत्या काही दिवसात हा पारा आणखी खाली घसरणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
सध्या विदर्भातील सर्व शहरांचे तापमान हे 12 अंशावर घसरलं आहे. विदर्भातील यवतमाळ शहराती सर्वाधिक कमी म्हणजे 12 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर त्यापाठोपाठ चंद्रपूर 12.2 आणि नागपूर 12.8 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या आठवड्यात विदर्भातील गारठा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संध्याकाळनंतर अनेक भागात गारठा वाढत असून पहाटे थंडीची तीव्रता अधिक प्रमाणात पाहायला मिळते. विदर्भातील थंडीचा कडाका बघता ठिकठिकाणी नागरिक स्वेटर्स, मफलर्स आणि शेकोट्यांचा आधार घेत आहेत. (Vidharbha coldest winter season record)
संबंधित बातम्या :
भारतीयांच्या हृदयाचा आकार 20 टक्क्यांनी लहान; संशोधनात भारतीय डॉक्टरांचा दावा
गायीच्या शेणापासून साकरल्या पणत्या आणि रांगोळी, नाशिकच्या जोडप्याची अमेरिकेपर्यंत चर्चा