दरोडेखोरांच्या गोळीबारात विजया बँकेच्या मॅनेजरचा मृत्यू

नाशिकमध्ये मुथूट फायनान्सच्या कार्यालयात दरोडेखोरांच्या गोळीबारात ऑडिटरचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच जळगावच्या विजया बँकेत दरोडेखोरांच्या गोळीबारात बँक मॅनेजरचा मृत्यू झाला आहे.

दरोडेखोरांच्या गोळीबारात विजया बँकेच्या मॅनेजरचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jun 18, 2019 | 11:10 PM

जळगाव : नाशिकमध्ये मुथूट फायनान्सच्या कार्यालयात दरोडेखोरांच्या गोळीबारात ऑडिटरचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच जळगावच्या विजया बँकेत दरोडेखोरांच्या गोळीबारात बँक मॅनेजरचा मृत्यू झाला आहे. रावेर तालुक्यातील विजया बँकेच्या शाखेत हा धक्कादायक प्रकार घडला. बँकेत अचानकपणे दोन सशस्त्र दरोडेखोर घुसले. त्यांनी बँक लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, बँक मॅनेजर करण नेगे आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना विरोध केला. तेव्हा या दरोडेखोरांनी बँक मॅनेजर करण नेगे यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये करण नेगे यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

रावेर तालुक्यातील निंबोल येथे विजया बँकेची शाखा आहे. करण नेगे हे या बँकेचे मॅनेजर होते. मंगळवारी (18 जून) बँकेचे कर्मचारी आपल्या कामात व्यस्त असताना दोन हेल्मेट घातलेले व्यक्ती बँकेत शिरले. त्यानंतर त्यापैकी एकाने बंदुकीच्या धाकावर बँक लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, करण नेगे यांनी या दरोडेखोरांना विरोध केला. तेव्हा बंदूकधारी दरोडेखोराने करण नेगे यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. नेगेंना गोळी लागल्याचं लक्षात येताच बँक कर्मचाऱ्यांनी सायरन वाजवलं. त्यानंतर दरोडेखोर बँकेतून पळून गेले. मात्र, ही संपूर्ण घटना बँकेच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

सायरन वाजताच परिसरातील लोकांनी बँकेकडे धाव घेतली. भागवत पाटील, मोहन पाटील आणि जितू पाटील यांनी करण नेगे यांना तात्काळ रावेरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु असून पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत.

संबंधित बातम्या :

नाशिकमध्ये मुथूट फायनान्सवर दरोड्याचा प्रयत्न, गोळीबारात ऑडिटर ठार, नांगरे-पाटील घटनास्थळी

इशकजादे!! आधी दारु प्यायले, मग एकमेकांच्या डोक्यात गोळ्या घातल्या!

फेसबुकवरुन ब्युटी पार्लरवालीशी चॅटिंग, बोगस रॉ एजंटचा पर्दाफाश

महिलांच्या ‘लव्हली’ व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये पुरुष घुसला आणि…

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.