रत्नागिरीमध्ये आणखी एका धरणाला गळती, तिवरे दुर्घटनेच्या पुनरावृत्तीची भीती
लांजा तालुक्यातील पन्हाळे धरणातून गळती होत असल्याने सध्या परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. सोमवारी रात्री पन्हाळे धरणातील सांडव्यातून गळती सुरू असल्याचं ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. (Villagers in fear due to leakage of Panhale dam in Lanja Taluka)
रत्नागिरी: जिल्ह्यामधील लांजा तालुक्यातील पन्हाळे धरणातून गळती होत असल्याने सध्या परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. सोमवारी रात्री पन्हाळे धरणातील सांडव्यातून गळती सुरू असल्याचं ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. पन्हाळे धरणाच्या गळतीमुळे ग्रामस्थांनी तिवरे धरण दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली आहे. (Villagers in fear due to leakage of Panhale dam in Lanja Taluka)
धरणाच्या गळतीमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सांडव्यातून चिखलयुक्त पाणी वाहत असल्याने ग्रामस्थांनी पंचायत समिती सदस्य अनिल कसबले यांना माहिती दिली. याबाबत तात्काळ रत्नागिरी उपविभागीय अधिकारी एस. व्ही. नलावडे यांना कळवण्यात आले. रत्नागिरी येथील अधिकारी एस. व्ही. नलावडे, कनिष्ठ अभियंता मंगेश शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सांडव्यातून गढूळ पाणी येत असल्याची पाहणी करून पन्हाळे धरणातून रात्रीपासून पाण्याचा विसर्ग काही प्रमाणात सुरु करण्यात आला आहे.
धरणाच्या गळतीमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धरणाच्या गळती विषयी अनेक तक्रारी करून दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
पन्हाळे धरण 100 टक्के भरले असून या धरणाच्या भिंतीतून मातीयुक्त पाणी निघत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धरणाची गळती काढण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप अनिल कसबले यांनी केला. तिवरे दुर्घटनेसारखा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती देखील कसबलेंनी व्यक्त केली.
अधिकाऱ्यांच्या भेटीवेळी पंचायत समिती सदस्य अनिल कसबले, माजी उपसरपंच तुकाराम मसणे, ग्रामपंचायत सदस्य विकास कांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष हरीश्चंन्द्र गुरव, प्रदीप मसणे व ग्रामस्थ उपस्थित होते.
तिवरे दुर्घटना
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण 2 जुलै 2019 रोजी फुटले होते. तिवरे धरण फुटल्याने भेंदवाडीतल्या 23 जणांचा बळी गेळा होता.
संबंधित बातम्या:
चिपळूणमधील तिवरे धरण फुटले, पाच जणांचा मृत्यू, 24 हून अधिक बेपत्ता
उस्मानाबादमध्ये दोन पाझर तलाव फुटले, नागरिकांचे स्थलांतर, एअर लिफ्टिंगची व्यवस्था
(Villagers in fear due to leakage of Panhale dam in Lanja Taluka)