‘या’ देशात ‘घट्ट पँट’ आणि ‘ट्रेंडी हेअरकट’ वर घातली बंदी; नियमांचे उल्लघंन केल्यास, जावे लागेल तुरुंगात !

उत्तर कोरियामध्ये पुन्हा एकदा एक अद्भुत फर्मान जारी करण्यात आले आहे. या देशात घट्ट पँट आणि ट्रेंडी हेअरकट करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. वास्तविक, किम जोंग-उनचे राज्य असलेल्या उत्तर कोरियाला असे वाटते की परदेशी पॉप संस्कृतीचा प्रभाव पडत आहे. त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे.

‘या’ देशात ‘घट्ट पँट’ आणि ‘ट्रेंडी हेअरकट’ वर घातली बंदी; नियमांचे उल्लघंन केल्यास, जावे लागेल तुरुंगात !
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 11:34 PM

मुंबईःउत्तर कोरियामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी कपडे घालण्याची पद्धत (Method of dressing) आणि स्टाईलीश ‘केस’ हे सामाजिक जीवनासाठी महत्त्वाचे घटक मानले जाते. परंतु, आता किम जोंग-उनचे राज्य असलेल्या उत्तर कोरियात या दोन्ही गोष्टीवर बंदी घालण्यात आली आहे. याच देशात गेल्या महिन्यात लोकांच्या मोबाईलचीही अचानक तपासणी करण्यात आली होती. समाजवादी देशभक्त युवक संघाने (Socialist Patriotic Youth Association) सुरू केलेल्या या मोहीमेत, देशाने बंदी घातलेल्या म्युझीक व्हिडीओ तरुण पाहत आहेत का याची तपासणी करण्यात आली. यासाठी युवकांच्या मोबाईलमधी हीस्ट्री लीस्टही चेक केली गेली होती. प्योंगयांग मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला थांबवून त्याच्या फोनची पाहणी केली होती. त्याच्या मोबाईलमध्ये दक्षिण कोरियाचे गाणे सापडल्याने, त्याला विद्यापीठात येण्यास बंदी घालण्यात आली, तर त्याला दररोज स्वत:वर टीका करणारी पत्रे लिहावी लागली. आता या विद्यार्थ्याचे प्रकरण न्यायालयाकडे (The case goes to court) सोपवण्यात आले आहे. ज्यावर तपास सुरू आहे.

यापूर्वीही झाले असे प्रकार

उत्तर कोरियाने गेल्या वर्षी 11 दिवस हसण्यावर, शॉपिंगवर जाण्यावर आणि दारू पिण्यावर बंदी घातली होती, किम जोंग उनने वडिलांच्या मृत्यूच्या 10 व्या जयंतीनिमित्त ही बंदी घातली होती. त्याचवेळी उत्तर कोरियामध्येही गेल्या वर्षी काळा कोट घालण्यावर बंदी घालण्यात आली होती.

पत्र लिहून माफी मागावी लागेल

‘मिरर’ रिपोर्टनुसार, एक व्हिडिओ देखील समोर आला आहे ज्यामध्ये 20 ते 30 वयोगटातील महिला घट्ट लेगिंग्ज घालून केस रंगवलेल्या दिसत आहेत. या पार्श्‍वभूमीवर असलेल्या या फुटेजमध्ये महिलांनी ‘ असभ्य कपडे घातल्याने, त्या देशाच्या गुन्हेगार असल्याचे बोलले जात आहे . त्याचवेळी, व्हिडिओमध्ये असा दावाही करण्यात आला आहे की, जो कोणी उत्तर कोरियाच्या फॅशन नियमांचे उल्लंघन करेल त्याला ताब्यात घेतले जाईल, मारहाण केली जाईल आणि तुरुंगात पाठवले जाईल. त्याचबरोबर या लोकांना पत्र लिहून माफी मागावी लागेल आणि भविष्यात अशी चूक करणार नाही, असेही त्यांना सांगावे लागेल.

युथ लीगचे सदस्य करतील पाहणी

गेल्या महिन्यात हमग्योंग प्रांतातील लोकांना उत्तर कोरियाची फॅशन फॉलो करण्याचा इशारा देण्यात आला होता. डेली एनकेच्या वृत्तात असेही सांगण्यात आले की सोशलिस्ट पॅट्रिओटिक युथ लीगचे सदस्य प्रत्येक शहराची पाहणी करतील आणि नियमांचे पालन केले जात आहे की नाही हे पाहतील. त्यानंतर अनेक तरुण-तरुणींना अडवून त्यांची रस्त्यात चौकशी केली जात आहे. केवळ त्यांचे कपडेच बघितले जात नाहीत तर ते संगीत आणि व्हिडिओ कोणते पाहतात आणि ऐकत आहेत, अशी विचारणाही केली जात आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.