हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराट सनी लिओनीला भेटला?

नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सध्या एका व्हिडीओमुळे चांगलीच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये सनी लिओनी एका व्यक्तीसोबत विमानतळावर जाताना दिसते. सनी लिओनीसोबत दिसणारी व्यक्ती टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली असल्याचं म्हटलं जात आहे. हा व्हिडीओ वेगाने सर्वत्र व्हायरल होत आहे. मात्र या व्हिडीओमागील सत्य समजल्यास तुम्हाला हसू आवरणार नाही. या व्हिडीओत सनी लिओनी विमानतळाकडे […]

हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराट सनी लिओनीला भेटला?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सध्या एका व्हिडीओमुळे चांगलीच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये सनी लिओनी एका व्यक्तीसोबत विमानतळावर जाताना दिसते. सनी लिओनीसोबत दिसणारी व्यक्ती टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली असल्याचं म्हटलं जात आहे. हा व्हिडीओ वेगाने सर्वत्र व्हायरल होत आहे. मात्र या व्हिडीओमागील सत्य समजल्यास तुम्हाला हसू आवरणार नाही.

या व्हिडीओत सनी लिओनी विमानतळाकडे जाताना दिसते. तिच्यासोबत असणारा तरुण हा विराट कोहलीसारखाच दिसतो. तो सनीसोबत बोलण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र व्हिडीओत दिसणारा व्यक्ती हा विराट कोहली नाही तर दुसराच आहे.

हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर अनेकांनी हा विराटच असल्याचं म्हटलं. मात्र विराटसारखा दिसणारा हा व्यक्ती विराट नसल्याचं स्पष्ट आहे.

आयपीएलमध्ये रविवारी हैदराबाद विरुद्ध बंगळुरु यांच्यात सामना झाला. मात्र या सामन्यापूर्वीच हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने, अनेकांनी विराट कोहली आणि सनी लिओनीची भेट झाल्याच्या कमेंट करण्यास सुरुवात केली.

व्हिडीओतील व्यक्ती विराटसारखा दिसत असल्याने लोकांनी त्याला विराटच संबोधलं. विराल भयानीने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे.

दरम्यान, कालच्या सामन्यात हैदराबादने विराट कोहलीच्या बंगळुरुचा तब्बल 118 धावांनी पराभव केला. हा आमचा सर्वात लाजिरवाणा पराभव असल्याचं विराट कोहलीने म्हटलं होतं.

VIDEO: 

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.