मुंबई : विरारमधील बोळींज येथे कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये पैसे टाकणारी व्हॅन पळवून नेल्याची घटना घडली आहे. व्हॅनच्या ड्रायव्हरनेच हे कृत्य केले असल्याची माहिती प्राथमदर्शनी मिळत आहे. (van driver who had come to deposit money in the ATM, fled)
या व्हॅनमध्ये चार कोटींपेक्षा अधिक रोख रक्कम असल्याची ही माहिती मिळाली आहे. मात्र या व्हॅनमध्ये किती रक्कम होती याबाबत पोलिसांनी अधिकृतरित्या कोणतीही माहिती दिलेली नाही. तसेच बँकेकडूनही याबाबत काही सांगण्यात आलेले नाही.
आज सायंकाळी 6 ते 6.30 च्या दरम्यान विरारच्या बोळींज येथील कोटक महिंद्रा बँकेतील एटीएममध्ये पैसे टाकण्यासाठी आलेल्या कॅश व्हॅनमधील दोन लोडर कर्मचारी पैसे भरण्यासाठी गाडीतून उतरले. ते एटीएममध्ये जात होते, तेवढ्यात ड्रायव्हर कॅश असलेली व्हॅन घेवून पळून गेला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या व्हॅनमध्ये अंदाजे चार कोटी रुपये असल्याची माहिती मिळाली आहे.
चोरीच्या घटनेची माहिती मिळताच विरार आणि अर्नाळा सागरी पोलीस घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी व्हॅनचा तपास सुरु केला आहे. सध्या पोलिसांनी सर्व रस्त्यांवर नाकाबंदी केली आहे. तसेच पोलिसांची तीन विशेष पथकं गाडीच्या मागावर रवाना करण्यात आली आहेत. अशी माहिती डीसीपी संजय पाटील यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या
वसई-विरार-नालासोपारा, ठाणे, मुंबईतील वाहन चोरणारी टोळी गजाआड, 13 लाखांच्या गाड्या जप्त
विरारमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तीन मुलींची सुखरुप सुटका
विरारमध्ये महिलेकडून रिक्षाचालकावर चाकूने वार, रिक्षाचालकाकडूनही मारहाण
घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 147 तोळे सोन्यासह 25 लाखांचा ऐवज जप्त, विरार पोलिसांची कारवाई
(Virar : van driver who had come to deposit money in the ATM, fled)