मुंबई : जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या 17 व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज लागतो आहे. या निकालांचे आतापर्यंतचे जे आकडे समोर आले आहेत त्यानुसार देशात एकदा पुन्हा मोदी सरकार सत्तेत येणार असल्याचे चित्र आहे. निकालांचा कल बघता देशात पुन्हा एकदा मोदी लाट दिसत आहे. आतापर्यंत आलेल्या आकड्यांनुसार, देशात भाजपला 300 च्यावर जागा मिळताना दिसत आहेत. तर काँग्रेस प्रणित यूपीएने अद्याप 100 चा आकडाही गाठलेला नाही.
लोकसभा निवडणुकांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात विजय मिळवल्याबाबत शेजारी देश श्रीलंका, मित्र देश इस्त्रायल, रशियासह जपान, नेपाळ, अफगाणिस्तान आणि भूतानने पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवडणूक जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
“माझे मित्र नरेंद्र मोदी तुम्हाला तुमच्या प्रभावी निवडणूक विजयाच्या हार्दिक शुभेच्छा. हे निवडणुकीचे निकाल जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीताल तुमचं नेतृत्त्व सिद्ध करणाऱ्या आहेत. आपण एकत्र येऊन भारत आणि इस्त्रायलमधील मैत्री आणखी घट्ट करु”, असं ट्वीट करत इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या.
Congratulations, my friend @Narendramodi, on your impressive election victory! The election results further reaffirm your leadership of the world’s largest democracy. Together we will continue to strengthen the great friendship between India & Israel.
Well done, my friend! ?????
— Benjamin Netanyahu (@netanyahu) May 23, 2019
“तुम्हाला विजयासाठी आणि जनतेने तुमचं नेतृत्व पुन्हा स्वीकारलं त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. भविष्यात भारत आणि श्रीलंकेचे संबंध आणखी चांगले होतील अशी आशा व्यक्त करतो”, अशी भावना श्रीलंकेचे राष्ट्रपती मैथ्रिपला सिरीसेना यांनी व्यक्त केली.
Congratulations on your victory and the peoples re-endorsement of your leadership.
Sri Lanka looks forward to continuing the warm and constructive relationship with India in the future.@narendramodi— Maithripala Sirisena (@MaithripalaS) May 23, 2019
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मोदींनी शुभेच्छा दिल्या. लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या विजयानंतर पुतीन यांनी स्वत: फोन करुन मोदींना शुभेच्छा दिल्या.
Russia’s President Vladimir Putin calls Prime Minister Narendra Modi to congratulate him over #ElectionResults2019 https://t.co/qYuqrTsAyv
— ANI (@ANI) May 23, 2019
जपानचे पंतप्रधान शिजो अबे यांनीही मोदींना शुभेच्छा दिल्या. शिंजो अबे यांनीही मोदींना फोन करन शुभेच्छा दिल्या.
Japan Prime Minister Shinzo Abe has congratulated Prime Minister Narendra Modi in a telephonic conversation. (File pic) pic.twitter.com/Ohef7Jbkkz
— ANI (@ANI) May 23, 2019
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही नरेंद्र मोदींना पत्र लिहून शुभेच्छा दिल्या.
Chinese President Xi Jinping congratulates PM @narendramodi on the electoral victory under his leadership.#ResultsWithAIR | #ElectionResults2019 pic.twitter.com/MwtxpLOh9X
— All India Radio News (@airnewsalerts) May 23, 2019
नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनीही मोदींना शुभेच्छा दिल्या.
Prime Minister of Nepal, K P Sharma Oli congratulates Prime Minister Narendra Modi over #ElectionResults2019 (file pic) pic.twitter.com/1xEqAm4FSU
— ANI (@ANI) May 23, 2019
अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घाणी यांनी ट्वीट करत मोदींना शुभेच्छा दिल्या. “भारतीय जनतेच्या हुकुमावर जिंकून आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा. भविष्यात अफगाणिस्तान आणि भारतातील संबंध आणखी मजबूत होतील अशी आशा आहे”, असं ट्वीट अशरफ घाणी यांनी केलं.
Afghanistan President Ashraf Ghani tweets, “Congratulations to Prime Minister Narendra Modi on a strong mandate from the people of India. The government & the people of Afghanistan look forward to expanding cooperation between our two democracies” #ElectionResults2019 (file pic) pic.twitter.com/pql5Ge7rJx
— ANI (@ANI) May 23, 2019
भूतानचा राजा जिग्मे खेसर नामगैल वांगचुक यांनीही मोदींना फोन करुन शुभेच्छा दिल्या.
King of Bhutan Jigme Khesar Namgyel Wangchuck congratulates Prime Minister Narendra Modi in a telephonic conversation. #ElectionResults2019 pic.twitter.com/LzXRKmV0Zx
— ANI (@ANI) May 23, 2019
गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षाही यंदाच्या निवडणुकांमधील विजय मोठा असणार आहे. ही निवडणूक भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची होती. त्यासाठी पक्षप्रमुखांनी स्वत: राज्यांमध्ये जाऊन प्रचार सभा घेतल्या. पक्षातील बड्या नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या सभा घेतल्या. अनेक घडामोडी या निवडणुकीत घडल्या. त्यानंतर आज अखेर या निवडणुकांचा निकाल हाती येतो आहे. त्यामध्ये जनतेने पुन्हा एकदा मोदी सरकारवर विश्वास दर्शवला आहे. देशभरात भाजपप्रणित एनडीए आघाडीवर आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारासणीतून जिंकले आहेत.