Video: बाप रे! ज्वालामुखीचा असा स्फोट तुम्ही कधीच पाहिला नसेल, लाव्हा तर उसळ्या मारतोय !
सध्या पृथ्वीचे एक रौद्र रुप सर्वांनाच चकित करत आहे. आईसलँड या देशातील उसळता ज्वालामुखी पाहून सगळेच अवाक् झाले आहेत. (iceland reykjavik volcano eruption)
मुंबई : पृथ्वीची अनेक रुपं आहेत. ती कधी आपल्या अगदीच हिरवीगार तर कधी ताजी टवटवीत दिसते. पृथ्वीवरील बर्फाळ प्रदेश पाहून अनेकजण आनंदीत होतात. तर कधीकधी कडाक्याच्या उन्हामुळे अनेकजणांना पृथ्वीचा रागसुद्धा येतो. पृथ्वीची ही विविध रुपं आपण पाहत आलो आहोत. मात्र, सध्या पृथ्वीचे एक रौद्र रुप सर्वांनाच चकित करत आहे. आईसलँड या देशातील उसळता ज्वालामुखी पाहून सगळेच अवाक् झाले आहेत. (volcano eruption and hot lava bubbling captured in Iceland Reykjavik)
असा ज्वालामुखीचा स्फोट तुम्ही पाहिला नसेल
आईसलँडची राजधानी रेयाकजाविक (Reykjavík) येथून काही अंतरावर एका महाकाय ज्वालामुखीचा स्फोट झाला आहे. हा स्फोट पाहून अनेकांनी तोंडात बोट घातले आहे. या ज्वालामुखीचा व्हिडीओ रॉयटर्स (Reuters) या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने आपल्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केला आहे. व्हिडीओमधील ज्वालामुखी सुरुवातीला सौम्य वाटतोय. मात्र नंतर ज्वालामुखीचे रौद्र रुप आपल्याला पाहायला मिळतेय. ज्वालामुखीतील लाव्हारस बाहेर पडताना मोठे मोठे स्फोट होत आहेत. या ज्वालामुखीमध्ये जसेजसे स्फोट होत आहेत; तसेतसे लाव्हारस उसळ्या मारताना दिसतोय. या ज्वालामुखीतून बाहेर येणार लाव्हारस हा अतिशय तप्त आणि लाल झाल्याचे दिसतेय.
पाहा व्हिडीओ :
Drone timelapse shows lava spewing from an Icelandic volcano pic.twitter.com/1ngdd7OulI
— Reuters (@Reuters) May 26, 2021
यापूर्वी अनेकवेळा ज्वालामुखीचा उद्रेक
आईसलँड देशाची राजधानी रेयाकजाविक तसेच इतर अनेक ठिकाणी ज्वालामुखीचे केंद्र आहे. या देशात यापूर्वी अनेकवेळा ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याच वर्षी मार्चमध्ये रेयाकजाविकपासून 40 किमी अंतरावर एक ज्वालामुखी अचानकपणे फुटला होता. रेखनाइस द्वीपकल्पातील हा ज्वालामुखी मागील 800 वर्षांपासून शांत होता.
दरम्यान, उसळता लाव्हारस आणि ज्वालामुखीचे विध्वंसक रुप पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त आहे. अशा प्रकारे लाव्हारस फेकणारा जिवंत ज्वालामुखी लोकांनी पाहिला नसल्याचे म्हटले जात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
इतर बातम्या :
(volcano eruption and hot lava bubbling captured in Iceland Reykjavik)