टिकटॉकवर प्रेम, पहिल्याच भेटीत लग्न, मध्य प्रदेशची लेक झाली वर्ध्याची सून

मध्य प्रदेशमधील मुलीची आणि महाराष्ट्रातील मुलाची टिकटॉकमधून मैत्री झाली. मैत्रीचं रुपातंर प्रेमात झालं आणि पहिल्याच प्रत्यक्ष भेटीत दोघे लग्नगाठीत अडकले.

टिकटॉकवर प्रेम, पहिल्याच भेटीत लग्न, मध्य प्रदेशची लेक झाली वर्ध्याची सून
Follow us
| Updated on: Sep 23, 2020 | 12:59 PM

वर्धा : प्रेम आंधळं असतं, असं म्हटलं जातं. वर्ध्यात जे घडलं ते ऐकून पाहून तुम्हालाही कदाचित असंच वाटेल (Boy And Girl Get Married In First Meeting). मध्य प्रदेशमधील मुलीची आणि महाराष्ट्रातील मुलाची टिकटॉकमधून मैत्री झाली. मैत्रीचं रुपातंर प्रेमात झालं आणि पहिल्याच प्रत्यक्ष भेटीत दोघे लग्नगाठीत अडकले. वर्ध्याच्या आर्वी इथं टिकटॉकवर व्हिडिओतून झालेल्या प्रेमाचं रुपांतर सहजीवनाची गाठ बांधण्यात झालं (Boy And Girl Get Married In First Meeting).

आजकाल अनेकांना सोशल मीडियावर व्हिडीओ टाकण्याचा छंद असतो. आर्वीतील हा युवकही नृत्य, अभिनयाचे वेगवेगळे व्हिडीओ टिकटॉकवर टाकायचा. आर्वीतील एका युवकाने टिक-टॉकवर व्हिडिओ बनवले. व्हिडीओ मध्यप्रदेशातील एका युवतीला आवडू लागले. तिने त्याचे टिकटॉक अकाउंट फालो करायला सुरुवात केली. काही महिने टिकटॉकवरच हाय हॅलो झालं आणि प्रेम खुलू लागलं. त्यांचे व्हिडिओ पाहून मध्य प्रदेशात राहणारी युवती त्याच्या प्रेमात पडली.

या दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्रीतूनच तीन त्याला प्रपोज केलं आणि त्यानंही होकार दिला.. कधीही एकमेकांना प्रत्यक्ष न भेटलेलं हे युगुल एकमेकांत पुरत गुरफटलं. कुणीही एकही गोष्ट एकमेकांपासून लपवून ठेवली नाही. मात्र, याचवेळी एक दुःखद प्रसंग युवतीवर ओढवला. कर्करोगासारख्या आजाराने तिला ग्रासलं. मात्र, या कठीण प्रसंगात युवकाने तिची साथ सोडली नाही. त्याच्या साथीने तिने कर्करोगावर मात केली आणि त्यांच्या प्रेमाचा विजय झाला. आजारातून बरे झाल्यानंतर तिने घराचा उंबरठा ओलांडला आणि त्याला भेटण्यासाठी राज्याच्या सीमा ओलांडून महाराष्ट्रातील वर्ध्याच्या आर्वीत पोहोचली (Boy And Girl Get Married In First Meeting).

युवकालाही ती आवडायची. तोही सतत तिच्याच विचारात मग्न असायचा. तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करायचा. ती थेट मध्यप्रदेशातून आर्वीत आल्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. तडक त्याने बसस्टॅण्ड गाठून तिची भेट घेतली. एकमेकांना पाहून दोघांच्याही आनंदाला पारावर राहिला नाही. मुलाच्या घरचे लग्नाला तयार झाले आणि यवतमाळ जिल्ह्यात मंदिरात दोघांचा विवाह पार पडला.

मात्र, या लग्नाने मुलीचे आई-वडील नाराज असून एकदिवस ते माफ करतील, या आशेने दोघांचा संसार सुरु झाला आहे. प्रेमाला सीमा नसतात, हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

Boy And Girl Get Married In First Meeting

संबंधित बातम्या :

नवऱ्याची चार लग्न, तरीही पत्नीला चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, माहेरच्यांकडून हत्या

Non Stop LIVE Update
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.