भरधाव ट्रव्हल्सची दुचाकीला धडक, आईसह 4 महिन्याच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू

भरधाव ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे. (Wardha travels two wheeler accident 4 month baby died)

भरधाव ट्रव्हल्सची दुचाकीला धडक, आईसह 4 महिन्याच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू
Follow us
| Updated on: Oct 16, 2020 | 3:27 PM

वर्धा : भरधाव ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे. यात दुचाकीवरील आई आणि 4 महिन्यांचा चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. तर या मुलाचे वडील गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Wardha travels bus two wheeler accident 4 month baby died)

वर्ध्यातील सावंगी ते दत्तपूर बायपास मार्गावरील सैनिकी ढाब्यासमोर हा अपघात घडला आहे. शीतल भूषण सावध (29) आणि अंशू भूषण सावध (4 महिने) अशी मृतांची नावं आहेत. तर जखमी असलेल्या पती भूषण सावध यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मांडवा येथील भूषण सावध त्यांची पत्नी आणि मुलासह दुचाकीने सावंगीकडून मांडवा येथे घरी जात होते. दरम्यान, सैनिक ढाब्याच्या जवळ ट्रॅव्हल्सने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेमुळे ती दुचाकी काही अंतरापर्यंत फरफटत नेली आहे. त्या तिघांनाही जबर दुखापत झाली.

या अपघातात शितल सावध आणि मुलगा अंशू सावध यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर भूषण सावध यांना गंभीर दुखापत झाली आहे. यातील मृत महिला ही सैन्यात कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. (Wardha travels two wheeler accident 4 month baby died)

संबंधित बातम्या : 

ठाण्यात एसटीचा भीषण अपघात, महिलेनं गमावले दोन्ही पाय

करणीमुळे वडिलांचा मृत्यू झाल्याचा संशय, भावडांकडून चौघांच्या हत्येची सुपारी

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.