Lockdown : सहा दिवस पायपीट करुन परतलेल्या मजुरांना जंगलात क्वारंटाईन, वाशिममधील ग्रामपंचायतचा प्रताप
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना मजुरी मिळत नसल्याने त्यांनी वर्धा जिल्ह्यातून मुलाबाळासह सहा दिवस पायी प्रवास करुन गाव गाठले.
वाशिम : वाशिम जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात कामाला (Washim Corona Update) गेलेले मजूर लॉकडाऊन दरम्यान आपल्या गावी परतले. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना चक्क जंगलाजवळील एका शेतात 9 दिवस क्वारंटाईन करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वाशिम जिल्ह्यातील वरदरी खुर्द येथील ग्रामपंचायतने हा प्रताप केला आहे. इतकंच नाही तर, 9 दिवस क्वारंटाईन असलेल्या या कुटुंबांसाठी जीवनावश्यक वस्तू आणि पाण्याची कोणतीही व्यवस्था केलेली नसल्याने या मजूर कुटुंबांवर (Washim Corona Update) उपाशी राहण्याची वेळ आली आहे.
वरदरी खुर्द येथील 23 आदिवासी मजूर वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे हरभऱ्याच्या हंगामासाठी गेले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना मजुरी मिळत नसल्याने त्यांनी वर्धा जिल्ह्यातून मुलाबाळासह सहा दिवस पायी प्रवास करुन गाव गाठले.
गावी पोहोचल्यावर गावातील नागरिकांनी त्यांना गावात घेण्यास मनाई केली. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना शाळेत किंवा सभामंडपात ठेवणं अपेक्षित होतं. मात्र, ग्रामपंचायत सरपंच आणि पोलीस पाटील यांनी त्यांना एका जंगलालगत असलेल्या शेतात क्वारंटाईन केलं. ज्या शेतात त्यांना ठेवले तिथे नाही पाण्याची व्यवस्था ना खाण्याची, त्यामुळे या कुटुंबांवर उपाशी (Washim Corona Update) राहण्याची वेळ आली आहे.
अमरावतीकरांनी स्वतःला 14 दिवस सेल्फ क्वारंटाईन करावं, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहनhttps://t.co/xKpZspAsT7
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 3, 2020
“आम्ही हरभऱ्याच्या हंगामासाठी हिंगणघाटला गेलो होतो. कोरोनामुळे काम बंद झालं आणि गाड्या बंद झाल्या, त्यामुळे आम्ही लहान मुलांना घेऊन पायी गावी आलो. मात्र, गावातील लोकांनी आम्हाला गावात येण्यास मनाई केली. सरपंचाने आम्हाला या शेतात ठेवलं येथे पाण्याची सोय नसून, रात्री मोठमोठे साप निघतात, त्यामुळे आम्हाला मुठीत जीव घेवून इथे राहावं लागत आहे”, असं मजुरांनी सांगितलं.
जिल्ह्यात बाहेर राज्यातील मजुरांची तपासणी करुन त्यांना शाळा, कॉलेजमध्ये क्वारंटाईन करुन त्यांची चांगली व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र, जिल्ह्यातील आदिवासी बांधव जिल्ह्यात परतल्यानंतर त्यांना अशी वागणूक मिळत असल्याने या कुटुंबांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
या संदर्भात मालेगाव येथील तहसीलदार यांना दूरध्वनीवरुन संपर्क साधला असता त्यांनी गावात आलेल्या मजुरांची व्यवस्था सरपंच आणि पोलीस पाटलांकडे असल्याचं सांगितलं. त्यामुळे या कुटुंबांना न्याय मिळणार का? असा प्रश्न उपस्थित (Washim Corona Update) केला जात आहे.
संबंधित बातम्या :
राज्यातील पोलीस दलाला कोरोनाचा विळखा, 361 पोलिसांना कोरोनाची लागण
चंद्रपुरात पहिला ‘कोरोना’बाधित रुग्ण, 50 वर्षीय सुरक्षारक्षकाला संसर्ग