ही शान कोणाची लालबागच्या राजाची….राजाचं मुखदर्शन पाहा लाईव्ह

लालबागचा राजाचे मुख दर्शन मंडळाच्या अधिकृत वेबसाईट, युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम, IOS आणि Android App वर घेता येणार आहे.

ही शान कोणाची लालबागच्या राजाची....राजाचं मुखदर्शन पाहा लाईव्ह
Follow us
| Updated on: Sep 05, 2024 | 8:20 PM

लालबागच्या राजाचा मुखदर्शन सोहळा पाहण्याची संधी भाविकांना मिळत आहे. थोड्याच वेळात जगभरातील करोडो भाविकांना लालबागच्या राजाचे दर्शन होणार आहे. यंदा लालबागच्या राजाचे सजावट काय असणार आहे याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे.लालबागच्या राजाच्या दर्शनाला दरवर्षी भाविकांची प्रचंड मोठ्या रांगा लागलेल्या असतात.

येथे पाहा लालबागच्या राजाचे मुखदर्शन –

lalbagcha raja

लालबागच्या राजाचं विलोभनीय रुप पाहण्यासाठी भाविक अगदी आतुर झालेले असतात. याची देही याची डोळा लालबागच्या राजाचे रुप आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी भाविक कोणतेही कष्ठ घ्यायला तयार असतो. कारण राजाच्या केवळ दर्शनाने आपले सर्व विघ्नाचं हरण होणार याची त्याला खात्रीच असते. अशा लालबागच्या राजाचे डोळेभरुन रुप पाहण्याची संधी इंटरनेट धारकांना मिळणार आहे.

सालाबादप्रमाणे यंदाही लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लालबागच्या राजाचा गणेशोत्सव शनिवार दिनांक 7 सप्टेंबर 2024 ते मंगळवार 17 सप्टेंबर 2024 या कालावधीत साजरा होत आहे. त्यापुर्वी जगभरातील गणेशभक्तांचे अराध्य दैवत बनलेल्या लालबागचा राजाचे,प्रसिद्धी माध्यमांसाठी फोटो सेशन आज गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी ठिक 7 वाजता आयोजित केले होते.

सामाजिक कार्याचा वसा

लालबागच्या राजासाठी यंदा अग्निशमन दलाने देखील मंडळाला आपली सेवा मोफत  देण्याचा निर्णय घेतला आहे. लालबागच्या राजाच्या मार्फत अनेक सामाजिक कामे देखील केली जातात. लालबागच्या राजातर्फे लायब्ररी, महत्वाच्या सर्जरीसाठी देखील अर्थसहाय्य केले जात असते. दरवर्षी लालबागच्या दानपेटीत भाविक कोट्यवधी रुपये दान करीत असतात असे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मानद सचिव सुधीर सिताराम साळवी यांनी म्हटले आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.