अमेरिकेत मॅच झाली म्हणून जिंकलो, गुजरातमध्ये झाली असती तर…; काँग्रेस नेत्याचा भाजपला चिमटा
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणूकीचा सामना महायुतीच जिंकणार असल्याचा दावा केला आहे. त्यास आता कॉंग्रेसच्या आमदारांने जोरदार उत्तर दिले आहे.
भारतीय क्रिकेट संघाने T20 वर्ल्ड कपवर देशाचे नाव कोरल्यानंतर आता राजकारण सुरु झाले आहे. भाजपाचे आता खेळातही मतांचे राजकारण सुरु केल्याचा आरोप अधिवेशनात झाला आहे. महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. विधीमंडळात भारतीय क्रिकेट संघाच्या विजयावरून आता श्रेयवाद सुरु झाला आहे. भारतीय संघ जिंकला आहे तर मग भाजपा नेते आशीष शेलार यांचे अभिनंद का करायचं असा सवाल विरोधकांनी करीत आज सभागृहात गोंधळ घातला आहे. जर भारतीय संघ जिंकला अमेरिकेत खेळत असल्याने जिंकला अन्यथा…असे विधान कॉंग्रेस नेत्याने करीत भाजपाला चिमटा घेतला आहे.
भारती क्रिकेट संघाने टी20 क्रिकेट वर्ल्ड कप 17 वर्षांनी जिंकला आहे. टी 20 क्रिकेट स्पर्धा यंदा अमेरिका आणि इतर देशात खेळवली गेली. या स्पर्धेत 20 संघानी प्रथमच सहभाग घेतला होता. भारत आयसीसीच्या रॅंकींगमध्ये अव्वल असणारा भारतीय संघ यंदाच्या स्पर्धेचा दावेदार मानला जात होता. आणि त्यास जागून भारता ही स्पर्धा रोमहर्षक महामुकाबल्यात साऊथ आफ्रीकेला हरवून खिशात घातली आहे. आता विजेती टीम मुंबईत न उतरता दिल्लीत उतरणार आहे. त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते भारतीय क्रिकेट संघाचे स्वागत दिल्लीत होणार आहे. या संदर्भात महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशनात सत्ताधारी पक्षाने आशीष शेलार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव का दिला आहे. विजय तर भारतीय संघाचा आहे ना अशी टिका कॉंग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी केला आहे.
विधानसभेत भाजपाच्या इतक्या जागा
मॅच अमेरिकेत झाली म्हणून इंडिया जिंकली ती जर गुजरातच्या अहमदाबादला झाली असती तर इंडीया हरली असती. त्यातही राजकारण केलं असतं…अशी फिरकी घेत कॉंग्रेसचे जालना येथील आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपाला चिमटा काढला आहे. महायुतीच विधानसभेची मॅच जिंकणार असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावर देखील गोरंट्याल यांनी फिरकी घेत देवेंद्र फडणवीस यांचे 105 आमदार असूनही ते उपमुख्यमंत्री झाले, ते काय विधानसभेची मॅच जिंकणार? त्यांच्या विधानसभेत केवळ 20 जागाच येणार असा टोला गोरंट्याल यांनी लगावला आहे.