ऊर्जा मंत्री म्हणाले वीजबिल भरावेच लागेल, आता वडेट्टीवार म्हणतात, लोकांच्या भावना तीव्र, मंत्रिमंडळात चर्चा करु

लोकांच्या भावना तीव्र आहेत. लोक आम्हाला भेटून निवेदने देत आहेत. त्यामुळे उर्जा खात्याच्या निर्णयावर मंत्रिमंडळात चर्चा होईल. | Vijay Wadettiwar

ऊर्जा मंत्री म्हणाले वीजबिल भरावेच लागेल, आता वडेट्टीवार म्हणतात, लोकांच्या भावना तीव्र, मंत्रिमंडळात चर्चा करु
विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री
Follow us
| Updated on: Nov 18, 2020 | 3:34 PM

नागपूर: लॉकडाऊनच्या काळातील विजेची बिलं (electricity bill) माफ केली जाणार नाहीत, असे सांगत उर्जामंत्री नितीन राऊत यांनी सामान्यांना शॉक दिल्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर आता राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी नवे वक्तव्य करून संभ्रम आणखीनच वाढवला आहे. (Vijay Wadettiwar on increased electricity bill issue)

उर्जा विभागाच्या निर्णयावर मंत्रिमंडळात चर्चा केली जाईल. लोकांवर अन्याय झाला असेल तर चर्चा होणे आवश्यक आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. त्यामुळे आता जनतेचा रोष टाळण्यासाठी महाविकासआघाडी सरकार वीज बिल कमी करण्याचा निर्णय घेणार का, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वीजबिल माफी होणारच नाही, या निर्णयावर एकप्रकारे फेरविचार करण्याचे संकेत दिले. लोकांच्या भावना तीव्र आहेत. लोक आम्हाला भेटून निवेदने देत आहेत. त्यामुळे उर्जा खात्याच्या निर्णयावर मंत्रिमंडळात चर्चा होईल. लोकांवर अन्याय होत असेल, काही चुकीचं होत असेल तर त्यावर चर्चा होणे गरजेचे आहे.

50 टक्के लोकांनी बिल भरले आहे. त्यामुळे आता केवळ उर्वरित 50 टक्के लोकांचा प्रश्न आहे. राज्य सरकारने एसटी महामंडळाला मदत केली. त्याप्रमाणे गरज पडल्यास वाढीव वीज बिलाचा भुर्दंड सोसाव्या लागणाऱ्या लोकांनाही मदत झाली पाहिजे, अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी मांडली.

‘शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी भाजपची नीती’ महाराष्ट्रावर (Maharashtra) सगळ्यात मोठं संकट असताना केंद्र सरकार (central government) राज्यासोबत दुजभाव करत असल्याची टीका मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी केली आहे. महाराष्ट्रातील जनतेने भाजपला मते दिली नाहीत का? मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाचे (bjp) खासदार राज्यात निवडून आले. राज्यातही जनतेनं त्यांचे 105 आमदार निवडून दिले. पण तरीही भाजपने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे धोरण अवलंबल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

संबंधित बातम्या:

Pravin Darekar | वीज बिल माफीच्या आश्वासनाचे काय झालं? प्रवीण दरेकरांचा ऊर्जामंत्र्यांना सवाल

श्रेयवादाच्या लढाईत वीज बिलमाफी अडकली?, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ऊर्जामंत्र्यांची फाईल फेटाळत असल्याचा बावनकुळेंचा आरोप

सरकारमध्ये दम असेल तर वीज बिलाची वसुली करुन दाखवावीच; राजू शेट्टींचे आव्हान

(Vijay Wadettiwar on increased electricity bill issue)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.