अमेरिकेत चिंताजनक परिस्थिती; सामान्य नागरिकांकडून पिस्तुल आणि बंदुकांच्या खरेदीचा सपाटा

वॉलमार्टच्या दुकानांतील बंदुका आणि शस्त्रविक्रीचा विभाग बंद करण्यात आला आहे. | US Presidential Election 2020

अमेरिकेत चिंताजनक परिस्थिती; सामान्य नागरिकांकडून पिस्तुल आणि बंदुकांच्या खरेदीचा सपाटा
Follow us
| Updated on: Oct 30, 2020 | 11:04 PM

वॉशिंग्टन: अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. येत्या 3 नोव्हेंबरला नवा राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठी  मतदान होईल, तर 4 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. मात्र, मतदानाचा दिवस जवळ येत चालल्यामुळे अमेरिकेतील शस्त्रविक्रीत अचानक मोठी वाढ झाली आहे. मतदानाच्या दिवशी किंवा निकालानंतर अमेरिकेत हिंसाचार उफाळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकन नागरिकांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी शस्त्रखरेदीचा सपाटा लावला आहे. हे प्रमाण इतके वाढले आहे की, अखेर अमेरिकेतील वॉलमार्टच्या दुकानांतील बंदुका आणि शस्त्रविक्रीचा विभाग बंद करण्यात आला आहे. (Weapon sales rocket up in US on backdrop of Presidential election 2020)

सुरुवातीला कोरोना आणि नंतरच्या काळात उसळलेल्या वांशिक संघर्षांमुळे अमेरिका गेल्या काही महिन्यांपासून अशांत आहे. अशातच आता निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे राजकीय किंवा सामाजिक गटात हिंसाचार उफाळण्याची भीती नागरिकांना वाटत आहे. त्यामुळेच आजपर्यंत कधीही शस्त्र खरेदीची गरज न वाटलेले नागरिकही सुरक्षेसाठी पिस्तुल आणि बंदुका खरेदी करताना दिसत आहेत. एका सर्वेक्षणानुसार देशातील 50 लाख लोकांनी पहिल्यांदाच शस्सास्त्र खरेदी केली आहे. अमेरिकेतील ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक मानली जात आहे.

काही दिवसांपूर्वीच फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्ग यानेही अमेरिकेतील या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली होती. आपला देश इतका विभागला गेला आहे, हे बघून मला चिंता वाटत आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यासाठी काही दिवस किंवा आठवडे जातील. या काळात देशभरात नागरी हिंसाचार उफाळण्याची भीती मार्क झुकरबर्ग याने बोलून दाखवली होती.

FBI आणि NSA सुरक्षा संस्थांकडूनही इशारा

याआधी देखील अमेरिकेच्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात हिंसाचाराच्या घटना घडू शकतात अशी माहिती समोर आली आहे. अमेरिकन नागरिकांना देखील निवडणूक निकालानंतर हिंसाचार भडकण्याची भीती आहे. यावर FBI आणि NSA सारख्या सुरक्षा संस्थांनी एक अहवाल देखील दिलाय. यानंतर अमेरिकेची काळजी वाढली आहे. जुलै 2020 मध्ये ‘ब्लॅक लाईव्ह मॅटर्स’ या वर्णभेदाविरुद्धच्या आंदोलनात देखील वॉशिंग्टनमध्ये मोठा हिंसाचार झाला होता. आता निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा हिंसक घटना होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या:

तिघांच्या हत्येनंतर फ्रान्समध्ये ‘मॅक्सिमम अलर्ट’, भारत सोबत असल्याचं सांगत मोदींकडून धीर

US Election 2020 : अमेरिकेत निकालाला उशीर झाल्यास असंतोषाची शक्यता : फेसबुक प्रमुख मार्क झुकरबर्ग

जे स्वत:ला वाचवू शकले नाहीत ते आपलं काय संरक्षण करणार, ओबामांचे ट्रम्प यांच्यावर टीकास्त्र

(Weapon sales rocket up in US on backdrop of Presidential election 2020)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.