Monsoon Rain | महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस, घाट-माथ्यावर दरडी कोसळण्याचा इशारा
महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा (Weather forecast Monsoon Rain Maharashtra) अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुणे : कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा (Weather forecast Monsoon Rain Maharashtra) अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यानुसार काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे . तर मुंबईसह उपनगरात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घाट माथ्यावर धबधब्यांचा पाण्याचा प्रवाह वाढण्याचा आणि दरडी कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात सध्या काही ठिकाणी पाऊस पडत आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाने अक्षरश: कहर केला. तर पुढील चार दिवस राज्यात कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Rain and thundershower with strong winds are likely to occur at many places over Mumbai, Mumbai suburban, Palghar, Pune, Raigad and Thane during the next 2-4 hours: Maharashtra State Disaster Management Authority
— ANI (@ANI) July 5, 2020
पुणे शहरात पुढील 24 तासात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबई आणि उपनगरात आज रविवारी आणि सोमवारी अतिवृष्टीचा इशारा आहे. घाट माथ्यावर पिकनिक स्पॉटवर धबधब्यांचा पाण्याचा प्रवाह वाढण्याचा आणि दरडी कोसळण्याचा इशाराही दिला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, उद्यापासून मराठवाडा आणि विदर्भात पाऊस कमी होत जाईल. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात 48 तासानंतर पाऊस कमी होईल. वातावरण बदलामुळे गुजरात किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. त्यामुळे पावसाचा वेग काहीसा मंदावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाचा (Weather forecast Monsoon Rain Maharashtra) आहे.
कोकण आणि गोव्यात पुढील चार ते पाच दिवस सर्वदूर पाऊस पडणार आहे. तर मध्य महाराष्ट्रात सोमवारी अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा आहे. मराठवाड्यात आणि विदर्भात आज अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!
तर एक-दोन ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा आहे. तर मराठवाड्यात आणि विदर्भात 6 ते 9 जुलैपर्यंत पाऊस कमी होत जाईल. मात्र या कालावधीत दोन्ही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात 7 जुलैपासून पाऊस कमी होईल, असा अंदाज वर्तवला आहे.
तर मध्य महाराष्ट्रात 24 तास मुसळधार पावसाचा इशारा आहे. उद्या काही ठिकाणी जोरदार अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुण्यात घाटमाथ्यावर दाट धुकं पडतील. तर काही ठिकाणच्या पिकनिक पॉईंटवर धबधब्यांचा पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर घाटमाथ्याच्या परिसरात दरडी कोसळण्याचा इशारा दिला (Weather forecast Monsoon Rain Maharashtra) आहे.
संबंधित बातम्या :
Rain Updates : महाराष्ट्रात मुसळधार, मुंबई-ठाण्यात पावसाचा जोर, अनेक भाग जलमय
नवी मुंबई सिडको ‘स्वप्नपूर्ती’ची पहिल्याच पावसात ‘जलपूर्ती’, गुडघ्याभर पाण्यात सापांचा वावर