लॉकडाऊन वाढल्याने लग्न लांबली, विदर्भातील हजारपेक्षा अधिक लग्न लांबणीवर

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Wedding event postpone due to lockdown) आहे.

लॉकडाऊन वाढल्याने लग्न लांबली, विदर्भातील हजारपेक्षा अधिक लग्न लांबणीवर
Follow us
| Updated on: May 02, 2020 | 12:29 PM

नागपूर : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Wedding event postpone due to lockdown) आहे. लॉकडाऊनचा सर्वच क्षेत्रावर परिणाम झालेला आहे. याचा परिणाम अनेकांच्या लग्नावरही झाल्याचे दिसत आहे. सध्या लग्नाचा हंगाम असल्याने विदर्भात साधारण हजारपेक्षा अधिक लग्नावर लॉकडाऊनमुळे विघ्न आलं आहे. लॉकडाऊन आता 17 मे पर्यंत वाढल्याने काहिंनी पुढच्या मुहुर्ताचा शोध सुरु केला आहे, तर काहींना दिवाळीनंतरंच लग्न उरकावं लागणार आहे. यादरम्यान काही नवरदेव मात्र संकटात सापडलेलं लग्न उरकण्यासाठी धळपळ करताना दिसत (Wedding event postpone due to lockdown) आहेत.

विदर्भातील मंगेश तांदूळकर यांचे 29 एप्रिलला लग्न होते. लग्नासाठी त्यांनी मोठी तयारी केली होती. पाचशेच्यावर पत्रिका वाटल्या होत्या. पण लॉकडाऊनमुळे लग्नचं संकटात आलं आहे. लॉकडाऊनमध्ये लग्नाची परवानगी मिळत नव्हती. आजचा मुहुर्त हुकला तर दिवाळीपर्यंत वाट पाहावी लागेल. त्यामुळे मंगेश तीन वऱ्हाडी घेवून लग्नाला निघाले होते.

लग्नाला जात असताना यावेळी पोलिसांनी त्याला अडवले. पण आपल्याच लग्नाची पत्रिका दाखवत नवरदेव मंगेशने वधूचं घर गाठलं. मंगेशने धळपळ करत, संकटात सापडलेलं आपलं लग्न कसंबसं उरकलं आहे. पण आजही अनेक भावी वर आणि वधू लग्नाच्या परवानगीची आतूरतेनं वाट पाहत आहेत.

मंगल कार्यालय बुकिंगच्या आकडेवारीनुसार या लॉकडाऊनमुळे विदर्भात साधारण हजारपेक्षा जास्त लग्न पुढे ढकलण्यात आली आहेत. पहिल्या लॉकडाऊनमध्ये ज्यांची लग्न होती, त्यांनी 14 एप्रिलनंतरचा मुहुर्त ठरवला होता. पण लॉकडाऊन तीन तारखेपर्यंत वाढवण्यात आला. त्यामुळे मग काहिंनी 3 मे नंतरच्या तारखा निश्चित केल्या होत्या. पण आता लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढवण्यात आल्याने लग्नात विघ्न आलेल्या साधारण हजारांच्या वर भावी वर-वधूंना आता दिवाळी नंतरच्या मुहुर्ताशिवाय पर्याय नाही.

संबंधित बातम्या :

जळगावात फेसबुक लाईव्हवर लग्न, नवदाम्पत्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 25 हजार

Corona Care | एका लग्नाची गोष्ट…, लॉकडाऊनचे नियम पाळत नागपुरात शुभमंगल

Lock Down | मंगल कार्यालयाचे अॅडव्हान्स परत द्या, प्रशासनाचे आदेश, लॉकडाऊनमुळे लग्न लांबली

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.