पश्चिम बंगालमध्ये दोन तोंडी साप, गावात खळबळ
पश्चिम बंगालमध्ये मिदनापूर जिल्ह्यात बेल्दा वन विभागात अंतर्गत येणाऱ्या एका गावात दुर्मिळ असा दुतोंडी साप (West Bengal two-headed snake) आढळला.

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये मिदनापूर जिल्ह्यात बेल्दा वन विभागात अंतर्गत येणाऱ्या एका गावात दुर्मिळ असा दुतोंडी साप (West Bengal two-headed snake) आढळला. अचानक दोन तोंडी साप आढळल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. वन विभागाच्या अधिकाऱ्याने याबाबतची माहिती (West Bengal two-headed snake) दिली.
बेल्दा वन विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा दुतोंडी साप ईकरुखी या गावातील लोकांना आढळला. मात्र त्यांनी या सापाला न मारताच तसेच जंगलात सोडून दिले. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव (West Bengal two-headed snake) घेतली.
West Bengal: A two-headed snake found in the Ekarukhi village of Belda forest range. (10.12.19) pic.twitter.com/jLD4mPWhv8
— ANI (@ANI) December 10, 2019
मात्र वनविभागाचे कर्मचारी पोहोचण्यापूर्वी गावाकऱ्यांनी या सापाला जंगलात सोडून दिले होते. याबाबत एका प्राणी विज्ञानशास्त्रज्ञ शिक्षकाने दिलेल्या माहितीनुसार, हा साप म्हणजे काही दैवी चमत्कार नसून हा एक जैविक (West Bengal two-headed snake) योगायोग आहे. ज्याप्रमाणे हत्तीचे पिल्लू दोन डोके घेऊन जन्माला येते. त्याप्रमाणे सापाला दोन तोंड असू शकते. ही विकासात्मक विसंगती आहे.
दरम्यान सरकारने ईकरुखी गावात सापडलेल्या या सापाची ओळख दुतोंडी क्रोबा या नावाने केली आहे.