तू कोणत्याही लफड्यांमध्ये जाऊ नको… जितेंद्र आव्हाड यांनी का दिला जीवलग मित्र प्रताप सरनाईक यांना सल्ला?
राजकारणात काही जोड्या प्रसिद्ध आहेत. विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे अशीच एक जोडी ओळखली जाते. दोघांचे मैत्रीत कधी पक्ष आड आला नाही. विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांचीही मैत्री अशीच फेमस होती. त्यांना तर दो हंसो का जोडा म्हणायचे...
राजकारण पक्ष वेगवेगळे असले तरी काही नेत्यांनी आपली मैत्रीत राजकारण आणले नाही. विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीत कधीच पक्ष किंवा राजकारण आड आले नाही. परंतू आता दोघेही हयात नाहीत.तशीच मैत्रीत ठाण्यातील या दोन आजी-माजी मंत्र्यात आहे. या दोन आजी- माजी मंत्र्यांनी एका कार्यक्रमात सहभाग घेतला तेव्हा त्यांच्या संवाद एकमेकांना आधार आणि प्रोत्साहन करणारा होता.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात देखील महाविद्यालयात काळापासून मैत्री आहे. दोघेही एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले होते. निमित्त होते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे संजू राठोड यांचा सत्कार आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते झाला. यावेळी एक वंजारी आणि बंजारीचा सत्कार करतोय असे वक्तव्य केले त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी संजू राठोड यांना टाळी दिली. यावेळी प्रताप सरनाईक म्हणाले की आव्हाड मी लहानपणापासून मित्र आहे. शिवाय आम्ही विद्यार्थी संघटनेत एकत्र काम केले आहे. ते आता माजी आणि मी आजी मंत्री आहे.तसेच भविष्यात म्हणजेच १५ – २० वर्षांनी आव्हाड हे आजी मंत्री होतील, अशी अपेक्षा व्यक्त करतो..जय सेवा लाल…असे म्हणत सरनाईक यांनी आव्हाड पुन्हा मंत्री व्हावे असा विश्वास व्यक्त केला.
माझे जवळचे मित्र नाहीत म्हणून आम्ही ३५ वर्ष एकत्र आहोत. कधी लांब गेलो..कधी जवळ आलो..कधी लांब गेलो.. लांब एकदाच गेलो. मात्र एकत्र राहिलो. जवळ राहण्याचा प्रमुख कारण म्हणजे ही माऊली (मिसेस सरनाईक) त्या अतिशय उत्तम स्वयंपाक बनवतात. त्यांच्या हातची कोणी मच्छी खाईल तो कधी विसरणार नाही. मच्छी कशी बनवायची असते हे त्यांच्याकडून शिकावे असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. ते पुढे म्हणाल की याची एक घाणेरडी सवय म्हणजे हा सात वाजता उठतो. हा स्वत: झोपत नाही दुसऱ्याला झोपू देत नाही.
खूप संघर्ष करून हे पुढे आले आहेत. मोजक्या लोकांना माहीत असेल आमलेट पावाची गाडी लावून आज हे लेम्बोर्गिनी गाडीचे मालक बनले आहेत. म्हणजे शंभर रुपयेचा धंदा.. दिवसाला कोटी रुपये कमावणारे हे दोघे आहेत. अशा कष्टाळू माणसाला जेव्हा यश मिळतं. तेव्हा यशाची किंमत कळते. मंत्रीपद मिळाले. याला म्हणतात सरनाईक साहेब.. माझ्या वैयक्तिक दृष्टीने त्यांना मंत्रीपद मिळालं ही आनंदाची बाब आहे.आमच्या नंतर आले ते खूप पुढे निघाले. मला कुठलाही रोलमध्ये फिरायची सवय आहे. मी ओपनिंगला पण जाऊ शकतो आणि बॉलिंग देखील टाकू शकतो.. सध्या मी बॉलिंग टाकतोय. कुठल्याही गेममध्ये आपण फिट बसू.. एवढं आपलं काम आहे. स्वभाव आहे. कुठेही गेलो तर फिट बसेल असे आव्हाड यांनी म्हणत संकेत दिले आहेत.
प्रतापला जे काही प्राप्त झाले आहे. त्याच्या दोन्ही मुलांचा देखील कौतुक आहे. त्याच्या साथीला उभे राहतात. प्रत्येक ठिकाणी तो त्यांना पुढे करतो. ही माऊली तर ग्रेटच आहे. प्रतापबरोबर त्याच्या कुटुंबांला देखील खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्हाला कल्पना नसेल पण मी पहिल्यांदा या कार्यक्रमाला आलो. साहेबांनी परिवहन मंत्री या नात्याने मला आमंत्रित केलं. त्यांचे मनापासून आभार मानतो. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो.
सरनाईक यांना सावध सल्ला
आता एसटी न बसता आपण विमानात आला तर बरं वाटेल. एसटीमध्ये फारच लिकेज आहे. आता प्रताप आला आहे तर इतका बदल होईल एसटीमध्ये, आता प्रत्येक दोन दिवसात एसटी फ्रंट पेज असेल. एसटी लाईन ऑफ द महाराष्ट्र.. ‘जहा कोई नही पोहचता वहा सूरजभी नही पहूच सकता वहा एसटी पोहचती है’. गरिबाच्या आयुष्यात बदल घडवायचा असेल. त्या एसटीला ताकद द्यावी लागेल. शाळेतील विद्यार्थी, शेतकऱ्यांची भाजी याच एसटीमधून येते. हे गरज आहे. तू हे काम पूर्ण करेल हे याची मला शंभर टक्के खात्री आहे. कामं करून घ्यायला विरोधी पक्षाचा आमदार म्हणून मीच तुझा बाजूला आहे असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. वेगवेगळे भ्रष्टाचार बाहेर निघत आहेत. काही लोकांचे ऑर्डरला स्टे ऑर्डर मिळतात. तू कुठल्याही लफड्यांमध्ये जाऊ नको.. तू आणि देवेंद्र फडणवीस असा मार्गे स्ट्रेट करून ठेव सगळं व्यवस्थित होईल. विश यू ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र.. जय भीम असा सावध सल्लाही शेवटी आव्हाड यांनी सरनाईक यांना दिला.