Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोटापाण्यासाठी दारु विकली तर काय बिघडलं?, तुम्ही हप्ते घेत नाही का?; भास्कर जाधवांचा पोलिसांवर हल्लाबोल

काही दिवसांपूर्वी पोलिसांनी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख बाबू सावंत यांच्यावर कारवाई केली होती. भास्कर जाधव यांनी त्यांची पाठराखण करताना पोलिसांवर शाब्दिक हल्ला चढवला. | Bhaskar Jadhav

पोटापाण्यासाठी दारु विकली तर काय बिघडलं?, तुम्ही हप्ते घेत नाही का?; भास्कर जाधवांचा पोलिसांवर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Nov 17, 2020 | 12:42 PM

रत्नागिरी: लोकांनी पोटापाण्यासाठी दारु विकली तर काय बिघडले, पोलीसही हप्ते घेतातच ना, असे वक्तव्य शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख बाबू सावंत यांच्यावर कारवाई केली होती. भास्कर जाधव यांनी त्यांची पाठराखण करताना पोलिसांवर शाब्दिक हल्ला चढवला. मात्र, भास्कर जाधव यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. (Shiv Sena leader Bhaskar Jadhav controversial statement about Police)

भास्कर जाधव यांनी आपल्या गुहागर मतदरासंघातील एका राजकीय कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केले. अवैध दारुविक्रीसाठी कारवाई झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्याची त्यांनी पाठराखण केली. पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं ? तुम्ही पोलीस हप्ते घेत नाही का ?, असे म्हणत मी तुमच्या पाठीशी आहे असे भास्कर जाधव यांनी जाहीरपणे सांगितले. कोकणातील राजकीय वर्तुळाता त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

फक्त दोन गोष्टींसाठी मला फोन करू नका मुलींची छेडछाड आणि चोरी. बाकी कोणत्याही गोष्टीला तुम्ही घाबरू नका, भास्कर जाधव तुमच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी म्हटले. त्यामुळे आता विरोधी पक्षांकडून हा मुद्दा उचलून सरकारची कोंडी केली जाण्याची शक्यता आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आणि अर्णव गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजप नेत्यांकडून पोलिसांना लक्ष्य करण्यात आले होते. मात्र, गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाविकासआघाडीच्या नेत्यांनी वेळोवेळी पोलीस दलाची पाठराखण केली होती. पोलिसांचा प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्षता आणि सचोटीवर शंका उपस्थित करणाऱ्या भाजप नेत्यांना महाविकासआघाडीने फटकारले होते. मात्र, आता शिवसेनेच्याच नेत्याने पोलिसांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने महाविकास आघाडीची कोंडी होण्याची शक्यता आहे.

भास्कर जाधवांसारखा नेता कार्यकर्त्यांना दारुच विकायला सांगणार- निलेश राणे भास्कर जाधव यांच्या गुहागर मतदारसंघात गेल्या वर्षभरात काहीही विकासकामे झालेली नाहीत. मतदारसंघातील रस्त्यांचीही चाळण झाली आहे. त्यामुळे आता भास्कर जाधव हे कार्यकर्त्यांना दारु विकायला सांगण्याशिवाय आणखी काय करणार, अशी खोचक टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली. त्यामुळे आता यावर भास्कर जाधव काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संंबंधित बातम्या:

आमदार भास्कर जाधव यांचा मंदिरात गोंधळ; वयोवृद्ध व्यक्तिला शिवीगाळ करत मारहाण

भास्कर जाधवांची नाराजी पार्ट टू, सभागृहातही शिवसेनेविरोधात आवाज

शिवसेना आमदार भास्कर जाधव यांची नाराजी दूर होईना, मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी

(Shiv Sena leader Bhaskar Jadhav controversial statement about Police)

'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्रींकडून पाठराखण
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्रींकडून पाठराखण.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.
संतापजनक! स्कूलबसच्या क्लीनरकडून 2 चिमूकल्यांवर अत्याचार
संतापजनक! स्कूलबसच्या क्लीनरकडून 2 चिमूकल्यांवर अत्याचार.
मोठी बातमी, नव्या वक्फ कायद्याला तूर्तास स्थगिती... कोर्टात काय घडलं?
मोठी बातमी, नव्या वक्फ कायद्याला तूर्तास स्थगिती... कोर्टात काय घडलं?.
काड्या करणं बंद करा.., 'त्या' एका प्रश्नावरून दानवे पत्रकारांवरच भडकले
काड्या करणं बंद करा.., 'त्या' एका प्रश्नावरून दानवे पत्रकारांवरच भडकले.
केस गळतीनंतर आता नख गळती; बुलढण्यात चाललंय काय?
केस गळतीनंतर आता नख गळती; बुलढण्यात चाललंय काय?.