नखांचा रंग सांगतो तुमचा आजार, तुमची नखे कोणत्या रंगाची?

नखांच्या रंग आणि आकारात होणारे बदल आपल्या आरोग्याबद्दल महत्त्वाची माहिती देऊ शकतात. पातळ, मऊ नखं व्हिटॅमिन बी किंवा इतर पोषकतत्त्वांच्या कमतरतेचे सूचक असू शकतात. पांढरे डाग झिंकच्या कमतरते किंवा फंगल संसर्गाचे लक्षण असू शकतात. पिवळी नखं धूम्रपान, फंगल संसर्ग किंवा मधुमेहाची सूचना देऊ शकतात. चमच्यासारखी नखं लोह-हीमोग्लोबिनची कमतरता किंवा लिव्हरच्या समस्या दर्शवू शकतात. नखांमधील बदलांना गांभीर्याने घ्या आणि योग्य वैद्यकीय सल्ला घ्या.

नखांचा रंग सांगतो तुमचा आजार, तुमची नखे कोणत्या रंगाची?
Follow us
| Updated on: Dec 09, 2024 | 6:25 PM

आपण आजारी आहोत की निरोगी आहोत हे ओळखण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यावरून आपण आपला आजार ओळखू शकतो. पण नखांच्या रंगावरूनही आजार ओळखता येतो हे तुम्हाला माहीत आहे का? नखांवरून आपला आजार समजू शकतो. कधी कधी आपली नखं तुटू लागतात. नखं वाढल्यावर ती कमकुवत होतात आणि तुटू लागतात. पुरुष आणि महिला या दोघांमध्येही ही समस्या असते. हवामानातील काही बदलांमुळेही ही समस्या होऊ शकते. कधीकधी आपल्या शरीरात होणारे बदल आणि आहारातील अपुरेपणामुळे नखांच्या रूपांतरणाचे कारण असू शकते. शरीराला आवश्यक पोषणतत्त्वे मिळत नसल्यास त्याचे परिणाम नखांवर दिसू लागतात. नखांमधील बदल आणि ते आपल्या आरोग्याशी कसे संबंधित आहेत, ते पाहूया.

पातळ आणि मऊ नखं

समान्यपणे बहुतेकांची नखं पातळ आणि मऊ असतात. मऊ आणि पातळ नखं तुटण्याची शक्यता अधिक असते. व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे ही नखं पातळ होतात. आपल्या शरीरात कॅल्शियम, लोह, आणि फॅटी ऍसिड्स यांचा तुटवडा देखील असू शकतो. त्यामुळेही नखं पातळ आणि मऊ होतात आणि ती तुटू लागतात.

पांढरे डाग

नखांवर असणारे पांढरे डाग “ल्यूकोनिचिया” (leukonychia) म्हणून ओळखले जातात. नखांवर पांढरे डाग आल्यास नवीन कपडे मिळतील असं सांगितलं जातं. परंतु प्रत्यक्षात ते फक्त डाग नाहीत, तर तो आपल्या आरोग्याशी संबंधित महत्त्वपूर्ण इशारा असतो. नखांवरील पांढरे डाग झिंकच्या तुटवड्यामुळे किंवा फंगल इन्फेक्शनचे लक्षण असू शकते, असे तज्ज्ञ सांगतात. काही वेळा शरीरातील ऍलर्जीमुळेही पांढरे डाग दिसतात.

हे सुद्धा वाचा

पिवळी नखं

पिवळी नखं सामान्यतः दिसतात. अत्यधिक धूम्रपानामुळे कधीकधी नखांना पिवळा रंग येतो. याशिवाय, हे फंगल इन्फेक्शन, श्वासविकार, रुमॅटोइड आर्थ्रायटिस किंवा थायरॉइड विकार दर्शवतात. पिवळी नखं असतील तर हे आजार आहेत असं समजायचं. नखांमध्ये पिवळा रंग येणं हा मधुमेह असू शकतो. त्यामुळे योग्यवेळी आरोग्य चाचणी करणं योग्य आहे.

चमच्याच्या आकाराची नखं

काहींची नखं चमच्यासारखी दिसतात. सामान्यपणे ही नखं वळलेली, म्हणजेच चमच्यासारखी होतात. तुमची नखं अशी असतील तर ते लो हेमोग्लोबिन, हायपोथायरॉइडीझम किंवा लिव्हर प्रॉब्लेम्स यांचे लक्षण असू शकतात. ही स्थिती सुधारण्यासाठी लोहयुक्त आहार घेतला पाहिजे.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.