Video – Akola | शेतात कुत्र्यांचा नागाशी सामना होतो तेव्हा..! नागाने काढला फणा, कुत्रे भुंकले, अखेर नागाने बदलला मार्ग
कुत्रे आणि साप समोरासमोर आलेले कधी बघीतले का?, दोन कुत्रे एकीकडं आणि दुसरीकडं फणा काढून नाग. असं दृश्य अकोल्यातील एका शेतकऱ्यानं शेतावर चित्रीत केले. हा व्हिडीओ खास तुमच्यासाठी...
अकोला : शेतात साप असतात. कधीकधी ते दंशही करतात. असाच भला मोठा नाग साप अकोल्यातील बाभुळगावात निघाला. या सापाला पाहून तिथं राखणीसाठी असलेले कुत्रे चांगलेच भुंकले. मग, नाग तरी मागे कसा राहणार. त्यानेही आपला फणा काढला. पण, शेवटी नागाला दोन्ही कुत्र्यांपुढं माघार घ्यावी लागली. भुईमुंगाच्या शेतात निघालेल्या नागासोबत थेट शेतावर राखण असलेल्या ओरीओ व चम्पी ((Orivo and Champi) ) नावाच्या कुत्र्यांनी सामना झाला. कुत्र्यांची आक्रमक भूमिका पाहता एकदा या नागाने थेट कुत्र्यावर फणा मारला. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील बाभुळगाव ते आलेगाव मार्गावरील (Babhulgaon to Alegaon road) गोवर्धन धाडसे (Govardhan Dhadse of Akola) यांच्या उसाच्या शेतात ही थरारक घटना घडली.
शेतात निघाला नाग
बाभुळगाव येथील गोवर्धन धाडसे यांच्या शेतात उस आणि भुईमुंग आहे. शेतात ओलीत असल्याने तिथे नागाचे देखील वास्तव आहे. गोवर्धन धाडसे यांच्यासोबत रोज शेतात गावरान जातीचे ओरीवो आणि चम्पी हे कुत्रे सोबत असतात. शेतातील खुल्या जागेत नागाचा संचार या दोन कुत्र्यांना आढळला. त्यांनी लगेच त्या नागावर भुंकणे सुरू केले. आणि नागावर अटॅक करण्याची तयारी या दोन कुत्र्यांनी एकत्रितपणे सुरू केली. पण, चम्पीवर थेट या नागाने असा हल्ला चढवित फणा उगारला.
पाहा व्हिडीओ
Akola – dogs and snake fighting pic.twitter.com/qEyztOMPzT
— Govind Hatwar (@GovindHatwar) March 19, 2022
नागाने बदलला आपला मार्ग
नागाच्या या कृत्याने दोन्ही कुत्रे एक पाऊल मागे झाले खरे. पण, त्यांनी या नागाला शेताच्या दुसऱ्या बाजूला मात्र जाऊ दिले नाही. अखेर या नागाने उसात प्रवेश करत मार्ग बदलला. या दोन कुत्र्यांनी नागासोबत केलेला हा संघर्ष शेतकऱ्यांनी मोबाईलच्या माध्यमातून चित्रीत केला आहे. शेतमालकाच्या कुत्र्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता थेट नागावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या नागाने त्याचा रस्ता वळविला. नागाच्या अटॅकने हे दोन्ही कुत्रे मात्र आता अधिक सजग झाले आहेत. ओरीओ आणि चम्पी या दोन गावरान कुत्र्यांमुळे आपण वाचल्याचं शेतकरी गोवर्धन धाडसे म्हणतात.