HappyBirthdayBigB: ‘जया यांनी रेखांना डिनरला बोलावलं आणि…’, अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यातले 8 मजेदार किस्से

बिग बी अमिताभ बच्चन आज त्यांचा 78 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

HappyBirthdayBigB: 'जया यांनी रेखांना डिनरला बोलावलं आणि...', अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यातले 8 मजेदार किस्से
Follow us
| Updated on: Oct 11, 2020 | 11:08 AM

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन आज 78 वर्षांचे झाले आहेत. बिग बी आज च्या उंचीवर पोहोचले आहेत तिथपर्यंत आतापर्यंत कोणालाही पोहोचता आलेलं नाही. ते या वयातही सिनेक्षेत्रात कार्यरत असून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. आज बच्चनजींच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्यांचे काही किस्से सांगणार आहोत, जे फार कमी लोकांना माहीत आहेत. (when jaya bachchan invited Rekha for dinner, 8 Interesting stories of Amitabh Bachchan)

सिनेक्षेत्रात येण्यापूर्वी अमिताभ बच्चन काय करायचे?

चित्रपट क्षेत्रात येण्यापूर्वी अमिताभ बच्चन कोलकाता येथे रेडिओ अनाऊन्सर आणि शिपिंग कंपनीत एक्जिक्युटिव्ह म्हणून काम करत होते. त्यावेळी त्यांचा पगार केवळ 800 रुपये इतका होता. 1968 साली ते पहिल्यांदा मुंबईत आले.

चित्रपटात पहिली संधी कशी मिळाली?

असे म्हटले जाते की, अमिताभ बच्चन यांच्याकडे पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे एक पत्र होते. या पत्रामुळेच त्यांना ए. के. अब्बास यांचा चित्रपट ‘सात हिंदुस्तानी’ यामध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.

सुरुवातीचे दिवस

अमिताभ बच्चन सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये प्रसिद्ध विनोदी कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक महमूद यांच्या घरी राहत होते. त्यानंतर बच्चन यांनी महमूद यांच्या ‘बॉम्बे टू गोवा’ या चित्रपटात कामही केले.

‘गुड्डी’ चित्रपटातून अमिताभ यांची हकालपट्टी

सुरुवातीला अमिताभ बच्चन यांना ‘गुड्डी’ या चित्रपटात अभिनय करण्याची संधी मिळाली होती. त्यांनी चित्रपटातील काही सीन शूट केले होते. परंतु नंतर त्यांना या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. चित्रपटातील भूमिकेत अमिताभ शोभत नाहीत, असे कारण त्यांना त्यावेळी सांगण्यात आले.

अमिताभ आणि जया बच्चन यांचं लग्न

‘अभिमान’ या चित्रपटाच्या एक महिना आधी अमिताभ यांनी अभिनेत्री जया भादुरी यांच्याशी लग्न केले. त्यांचा लग्नाचादेखील एक मजेदार किस्सा आहे. जंजीर हा चित्रपट हिट झाल्यामुळे चित्रपटातील सर्व कलाकार आणि क्रू मेंबर्स परदेशात फिरण्यासाठी गेले होते. अमिताभ आणि जया यांची ही पहिलीच एकत्र परदेश यात्रा होती. त्यासाठी अमिताभ यांनी त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांच्याकडे परवानगी मागितली. यावेळी हरिवंशराय अमिताभ यांना म्हणाले की, “परदेशात जाण्यापूर्वी तुला जयाशी लग्न करावे लागेल, त्यानंतरच तू जयासोबत परदेशात जाऊ शकतोस”.

जया यांनी रेखा यांना डिनरसाठी बोलावलं

त्याकाळी सर्व वर्तमानपत्रांमध्ये, मासिकांमध्ये अमिताभ आणि अभिनेत्री रेखा यांच्या कथित प्रेमप्रकरणाच्या बातम्या झळकत होत्या. त्यामुळे अमिताभ यांच्या घरी गोंधळ उडाला होता. या बातम्यांना कंटाळून जया यांनी रेखा यांना डिनरसाठी घरी बोलावलं होतं. त्यानंतर रेखा जयाजींच्या घरी गेल्या. जया यांनी रेखा यांचं आदरातिथ्य केलं, जेवू घातलं, संपूर्ण घर दाखवलं. त्यानंतर रेखा त्यांच्या घरी जाण्यासाठी निघाल्या तेव्हा जया यांनी त्यांना सांगितले की, काहीही झालं तरी मी अमिताभजींना सोडणार नाही. (चाहे जो हो जाए, मैं अमिताभ को नहीं छोड़ूंगी.) हे ऐकून रेखा यांना धक्का बसला होता.

राजकारणात यश

1984 साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांनी अमिताभ यांना राजकारणात उतरण्याचा सल्ला दिला. त्यानंतर अमिताभ बच्चन अलाहाबाद मतदारसंघातून निवडणूक लढले. बच्चन यांनी त्यावेळी दिग्गज नेत्या हेमवती नंदन बहुगुणा यांचा पराभव केला.

अफगाणिस्तानात मोठं स्टारडम

अमिताभ बच्चन यांना अफगाणिस्तानमध्ये मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. अमिताभ बच्चन अफगाणिस्तानमध्ये ‘खुदा गवाह’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना अफगाणिस्तानचे राष्ट्रपती नजीबुल्लाह यांनी अमिताभ यांच्या सुरक्षेसाठी खूप मोठी फौज तैनात केली होती. ‘खुदा गवाह’ हा चित्रपट अफगाणिस्तानमधील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक आहे.

संबंधित बातम्या

HBD Amitabh Bachchan: 50 वर्षांच्या करिअरमध्ये सर्वाधिक गाजले बीग बींचे 10 डायलॉग

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.