“ज्यांनी सुशांत सिंह प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची बदनामी केली त्यांनी जाहीर माफी मागावी”

सुशांत सिंह प्रकरणात ज्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांची बदनामी केलीये, त्यांनी तोंड न लपवता माफी मागावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केलीये.

ज्यांनी सुशांत सिंह प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची बदनामी केली त्यांनी जाहीर माफी मागावी
(फाईल फोटो)
Follow us
| Updated on: Oct 03, 2020 | 11:52 PM

मुंबई : ज्यांनी सुशांत सिंह प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची बदनामी केली, त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. सुशांत सिंह प्रकरणात एम्सचा विशेष अहवाल आल्यानंतर रोहित पवार यांनी ही मागणी केली. (who defamed the Maharashtra Police in the Sushant Singh case should  a apology Demand Rohit Pawar)

सुशांत सिंहची हत्या झाली नाही तर त्याने आत्महत्याच केली असल्याचा अहवाल दिल्लीच्या एम्स रूग्णालयाच्या डॉक्टरांनी दिला आहे. त्यानंतर ज्यांनी सुशांत सिंह प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची बदनामी केली त्यांनी तोंड न लपवता माफी मागावी, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

“बिहार निवडणुकीसाठी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं भांडवल करु पाहणाऱ्या नेत्यांच्या मनसुब्यांवर एम्सच्या अहवालाने पाणी फेरलं गेलं. त्यामुळं मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे”, असा टोला लगावत ज्यांनी महाराष्ट्राची व महाराष्ट्र पोलीस दलाची बदनामी केली त्या सर्वांनी तोंड न लपवता जाहीर माफी मागावी, असं रोहित म्हणाले.

सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली नसून, हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचा दावा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सच्या (AIIMS) विशेष पथकाने केला आहे. त्याचप्रमाणे या विशेष पथकाने आपला संपूर्ण अहवाल सीबीआयकडे सुपूर्द केल्याचे कळते आहे. याआधीही एम्सच्या (AIIMS) विशेष पथकाने सुशांतवर विषप्रयोग केला गेल्याचा दावा फेटाळून लावला होता.

अहवाल सांगतोय हत्या नव्हे आत्महत्या!

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात हत्येसह अनेक संशय व्यक्त करण्यात आले होते. मुंबईच्या कूपर रुग्णालयात सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले होते. मात्र, या शवविच्छेदन अहवालात योग्य माहिती न देण्यात आल्याने कूपर रुग्णालयाच्या या अहवालावरदेखील संशय व्यक्त करण्यात आला होता. यामुळे एम्सच्या डॉक्टरांचे एक विशेष पथक नेमून या अहवालाचा पुन्हा अभ्यास केला गेला.

एम्सच्या (AIIMS) या विशेष पथकाने सुशांतचा व्हिसेरा अहवाल सादर केला. या अहवालानुसार सुशांतवर कुठलाही विषप्रयोग करण्यात आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यानंतर त्यांनी आता सुशांतच्या हत्येची शक्यताही नाकारली आहे. सगळ्या तपासाअंती सुशांतची हत्या झाल्याचे कुठलेही पुरावे नाहीत, तर सगळ्या गोष्टी त्याने आत्महत्या केली असावी याकडेच इशारा करतात, असे त्यांनी म्हटले आहे.

(who defamed the Maharashtra Police in the Sushant Singh case should  a apology Demand Rohit Pawar)

संबंधित बातम्या

Sushant Singh Rajput | सुशांतची हत्या नव्हे आत्महत्याच!, एम्सच्या विशेष पथकाचा दावा 

Sushant Singh Rajput | सुशांतवर विषप्रयोग झाला नाही, व्हिसेरा रिपोर्ट AIIMSकडून सीबीआयकडे सुपूर्द!

Sushant Singh Rajput case | CBI पथक कूपर रुग्णालयात, शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी

ड्रग्ज देवाणघेवाणीसाठी सुशांतकडून वापर, रियाचा दावा, जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.