Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण आहेत माया टाटा ? वय 34, टाटा ग्रुपमध्ये त्यांची चर्चा का होत आहे ?

रतन टाटा यांच्या मृत्यूनंतर टाटा घराण्यातील एका 34 वर्षांच्या तरुणीचे नाव चर्चेत आले होते. माया टाटा असे त्यांचे नाव असून त्यांचे नाव टाटा यांच्या संभाव्य वारसदारात होते. कोण आहेत माया टाटा ? रतन टाटा यांच्या त्या कोण आहेत ? हे पाहूयात...

कोण आहेत माया टाटा ? वय 34, टाटा ग्रुपमध्ये त्यांची चर्चा का होत आहे ?
Follow us
| Updated on: Oct 14, 2024 | 4:27 PM

टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टचे नवीन चेअरमन म्हणून त्यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांची नुकतीच निवड झाली आहे. मुंबईत झालेल्या एका बोर्ड बैठकीत त्यांच्या खांद्यावर टाटा ट्र्स्टची जबाबदारी सोपविण्यात आली होती. परंतू या दरम्यान माया टाटा यांचे देखील नाव चर्चेत आले आहे. रतन टाटा यांच्या वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहीले जात आहे. माया टाटा कुटुंबाचा एक हिस्सा आहेत, त्यांनी टाटा समुहात मोठ्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे निभावलेल्या आहेत.

रतन टाटांच्या नंतर नाव चर्चेत

माया टाटा या टाटा ट्रस्टचे नवे चेअरमन नोएल टाटा आणि आलू मिस्री यांच्या कन्या आहे. आणि दिवंगत रतन टाटा यांची भाची आहे. अवघ्या 34 वर्षांची माया टाटा परदेशातून आपले उच्च शिक्षण संपवून टाटा समुहात महत्वाच्या जबाबदाऱ्या पेलत आहेत. रतन टाटा यांच्या निधनानंतर संभाव्य वारसदारांच्या यादीत त्यांचे देखील नाव चर्चेत आले होते. परंतू बैठकीत अखेर नोएल टाटा यांना टाटा ट्रस्टचे चेअरमन म्हणून निवडण्यात आले.

ब्रिटनमधून शिक्षण घेतले

माया टाटा यांचे शिक्षण प्रख्यात ब्रिटीश बिझनेस स्कूल मधून झाले आहे. तर वारविक युनिव्हर्सिटीतून त्यांनी पदवी मिळविली आहे. परदेशातून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी आपल्या करीयरची सुरुवात टाटा ग्रुपमधून केली. टाटा कॅपिटलची उपकंपनी टाटा अप्रॉच्युनिटी फंडमधून त्यांनी आपल्या करीयरची सुरुवात केली आहे.

Tata Neu लॉंचमध्ये मोठा रोल

टाटा ग्रुपमध्ये माया टाटा यांनी आपले गुणवत्ता अनेक जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडत सिद्ध केली आहे. त्यांच्या कारकीर्दीत टाटा ग्रुपच्या Tata Neu ऐपचे लॉंचिंग झाले होते. त्यानंतर टाटा अप्रॉच्युनिटी फंड कंपनीला बंद करण्यात आले होते. त्यानंतर माया यांनी टाटा डिजिटलमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती.

रतन टाटा यांचे निधन

गेल्या आठवड्यात बुधवारी टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे निधन झाल्याचे वृत्त आल्याने उद्योग जगतासह सर्वसामान्यांनाही धक्का बसला. मुंबईतील ब्रिच कॅंडी रुग्णालयात उपचार सुरु असताना 86 व्या वर्षी त्यांनी अंतिम श्वास घेतला. रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा ग्रुपने आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमवले.त्यांनी साल 1991 ते 2012 पर्यंत टाटा सन्सचे नेतृत्व केले होते.

'दारात आलेल्या कुत्र्याला..', भिडेंच्या आडून राजू पाटलांचा टोला कोणाला
'दारात आलेल्या कुत्र्याला..', भिडेंच्या आडून राजू पाटलांचा टोला कोणाला.
निर्धार नाही, पक्ष बचाव मेळावा आहे; संजय शिरसाट यांची टीका
निर्धार नाही, पक्ष बचाव मेळावा आहे; संजय शिरसाट यांची टीका.
अमरावतीचं माझ्यावर कर्ज,फडणवीस विमानतळाच्या लोकार्पणानंतर काय म्हणाले?
अमरावतीचं माझ्यावर कर्ज,फडणवीस विमानतळाच्या लोकार्पणानंतर काय म्हणाले?.
मुलुंडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी शिक्षकाच्या अंगावर फेकला कोळसा
मुलुंडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी शिक्षकाच्या अंगावर फेकला कोळसा.
'या' जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई अन् तरूणांना लग्नासाठी कुणी मुली देईना
'या' जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई अन् तरूणांना लग्नासाठी कुणी मुली देईना.
मी पोलिसांना शरण येतो; निलंबित रणजित कासलेचा नवा व्हिडीओ
मी पोलिसांना शरण येतो; निलंबित रणजित कासलेचा नवा व्हिडीओ.
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाच नाव बदलणार?कोणी केली मागणी, नवं नाव काय?
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाच नाव बदलणार?कोणी केली मागणी, नवं नाव काय?.
NASA तील भारतीय महिला अधिकाऱ्याला नोकरीवरून काढलं, कारण ठरले ट्रम्प
NASA तील भारतीय महिला अधिकाऱ्याला नोकरीवरून काढलं, कारण ठरले ट्रम्प.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन.
आता अमरावती-मुंबई दोन तासात, आज विमानतळाचं लोकार्पण; काय आहेत फायदे?
आता अमरावती-मुंबई दोन तासात, आज विमानतळाचं लोकार्पण; काय आहेत फायदे?.