टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टचे नवीन चेअरमन म्हणून त्यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांची नुकतीच निवड झाली आहे. मुंबईत झालेल्या एका बोर्ड बैठकीत त्यांच्या खांद्यावर टाटा ट्र्स्टची जबाबदारी सोपविण्यात आली होती. परंतू या दरम्यान माया टाटा यांचे देखील नाव चर्चेत आले आहे. रतन टाटा यांच्या वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहीले जात आहे. माया टाटा कुटुंबाचा एक हिस्सा आहेत, त्यांनी टाटा समुहात मोठ्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे निभावलेल्या आहेत.
माया टाटा या टाटा ट्रस्टचे नवे चेअरमन नोएल टाटा आणि आलू मिस्री यांच्या कन्या आहे. आणि दिवंगत रतन टाटा यांची भाची आहे. अवघ्या 34 वर्षांची माया टाटा परदेशातून आपले उच्च शिक्षण संपवून टाटा समुहात महत्वाच्या जबाबदाऱ्या पेलत आहेत. रतन टाटा यांच्या निधनानंतर संभाव्य वारसदारांच्या यादीत त्यांचे देखील नाव चर्चेत आले होते. परंतू बैठकीत अखेर नोएल टाटा यांना टाटा ट्रस्टचे चेअरमन म्हणून निवडण्यात आले.
माया टाटा यांचे शिक्षण प्रख्यात ब्रिटीश बिझनेस स्कूल मधून झाले आहे. तर वारविक युनिव्हर्सिटीतून त्यांनी पदवी मिळविली आहे. परदेशातून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी आपल्या करीयरची सुरुवात टाटा ग्रुपमधून केली. टाटा कॅपिटलची उपकंपनी टाटा अप्रॉच्युनिटी फंडमधून त्यांनी आपल्या करीयरची सुरुवात केली आहे.
टाटा ग्रुपमध्ये माया टाटा यांनी आपले गुणवत्ता अनेक जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडत सिद्ध केली आहे. त्यांच्या कारकीर्दीत टाटा ग्रुपच्या Tata Neu ऐपचे लॉंचिंग झाले होते. त्यानंतर टाटा अप्रॉच्युनिटी फंड कंपनीला बंद करण्यात आले होते. त्यानंतर माया यांनी टाटा डिजिटलमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती.
गेल्या आठवड्यात बुधवारी टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे निधन झाल्याचे वृत्त आल्याने उद्योग जगतासह सर्वसामान्यांनाही धक्का बसला. मुंबईतील ब्रिच कॅंडी रुग्णालयात उपचार सुरु असताना 86 व्या वर्षी त्यांनी अंतिम श्वास घेतला. रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा ग्रुपने आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमवले.त्यांनी साल 1991 ते 2012 पर्यंत टाटा सन्सचे नेतृत्व केले होते.