ट्रेनच्या डब्यांवर पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या का असतात? जाणून घ्या ही महत्त्वपूर्ण माहिती

भारतीय रेल्वेद्वारे वापरल्या जाणारी बहुतेक चिन्हे आणि संकेत रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी असतात. याशिवाय भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अनेक प्रकारची चिन्हे आणि सांकेतिक सूचनादेखील दिल्या जातात. (Why are there yellow and white stripes on the train carriages, know this important information)

ट्रेनच्या डब्यांवर पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या का असतात? जाणून घ्या ही महत्त्वपूर्ण माहिती
ट्रेनच्या डब्यांवर पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या का असतात?
Follow us
| Updated on: May 30, 2021 | 8:19 PM

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. इतके मोठे रेल्वे नेटवर्क चालवण्यासाठी विविध चिन्हे आणि संकेतांचा वापर केला जातो. या चिन्हे, संकेतांवरून तुम्हाला रेल्वेच्या परिस्थितीचा अंदाज घेता येतो. केवळ भारतच नव्हे तर कोणत्याही देशात चिन्हे, संकेतांशिवाय अर्थात सिग्नलशिवाय रेल्वेचे संचालन होऊ शकत नाही. भारतीय रेल्वेद्वारे वापरल्या जाणारी बहुतेक चिन्हे आणि संकेत रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी असतात. याशिवाय भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अनेक प्रकारची चिन्हे आणि सांकेतिक सूचनादेखील दिल्या जातात. (Why are there yellow and white stripes on the train carriages, know this important information)

रेल्वेच्या डब्यांवरील पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या पट्टी

रेल्वे स्थानकांवर ये-जा करणाऱ्या ट्रेनच्या अनेक डब्यांवर तुम्ही पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाच्या पट्ट्या जरुर पाहिल्या असतील. या पट्ट्या त्या डब्याच्या शेवटी असलेल्या टॉयलेटच्या खिडकीवर रेखाटलेल्या असतात. पाहायला गेल्या तर या पट्ट्या सर्वसाधारण स्वरुपाच्याच असतात. मात्र त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपल्यासारख्या रेल्वे प्रवाशांना या पट्ट्यांचे महत्त्व आणून घेणे अधिक गरजेचे आहे. अनेक वेळा कोणत्याही ट्रेनसाठी प्लॅटफॉर्मवर हजारो लोकांची गर्दी झालेली असते. अर्थात ही लोक त्या ट्रेनची प्रतिक्षा करीत असतात. या गर्दीतील अनेक प्रवासी हे जनरल डब्याने अर्थात सेकंड क्लास डब्याने प्रवास करणारे असतात.

पांढरा आणि पिवळ्या रंगाच्या पट्ट्या देतात या गोष्टींचे संकेत

कोणत्याही ट्रेनमध्ये स्लीपर कोचच्या तुलनेत जनरल कोचची संख्या खूप कमी असते. त्यामुळे प्रवाशांना जनरल कोच नेमके कुठे आहेत हे चटकन कळण्यासाठी जनरल कोचवर पट्ट्या रेखाटलेल्या असतात. सेकंड क्लासने प्रवास करणारे प्रवासी पिवळ्या आणि पांढऱ्या पट्ट्यांवरून सहज समजते की आपल्याला याच जनरल कोचमध्ये बसायचे आहे. भारतीय रेल्वेमार्फत सर्वसाधारणपणे जनरल कोचची व्यवस्था ट्रेनच्या शेवटी केलेली असते. पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यांमुळे जनरल कोचची ओळख पटते. त्याचबरोबर स्लीपर क्लास आणि एसी कोचपासून वेगळे केल्याचेही या पट्ट्यांवरून लक्षात येते. तुम्ही जर पहिल्यांदाच रेल्वे प्रवास करायला निघाला असाल तर भारतीय रेल्वेच्या या चिन्हे आणि संकेतांची आधी ओळख करून घ्या. रेल्वे प्रवासात चिन्हे, संकेत अर्थात सिग्नलची पुरेशी माहिती असणे आवश्यकच असते. अन्यथा प्रवासामध्ये आपली गोंधळल्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. (Why are there yellow and white stripes on the train carriages, know this important information)

इतर बातम्या

1.60 लाखाची Royal Enfield Thunderbird 350 अवघ्या 53 हजारात खरेदीची संधी

बनावट क्लिप तयार करुन बदनामी केल्याचा आरोप, आमदार निलेश लंकेंकडून मनसे पदाधिकाऱ्याला 1 कोटीची नोटीस

एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.
गृहमंत्रीपदावरून राज्याचं सरकार अधांतरी लटकतंय, हे कसलं मजबूत सरकार ?
गृहमंत्रीपदावरून राज्याचं सरकार अधांतरी लटकतंय, हे कसलं मजबूत सरकार ?.
राज कुंद्राला समन्स, आज ईडीसमोर हजेरी
राज कुंद्राला समन्स, आज ईडीसमोर हजेरी.
'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला
'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला.
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?.
शिंदे अचानक दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर म्हणाले, 'असा कोणता नियम...'
शिंदे अचानक दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर म्हणाले, 'असा कोणता नियम...'.
विधानसभेच्या पराभवानंतर मनसे नेत्याचा राजीनामा, राज यांना पाठवलं पत्र
विधानसभेच्या पराभवानंतर मनसे नेत्याचा राजीनामा, राज यांना पाठवलं पत्र.