Made In China | चिनी वस्तू इतक्या स्वस्त कशा? कॉपीकॅट चीनच्या बनवेगिरीची कहाणी
चीनी वस्तू स्वस्तात मिळतात याचं कारण, चीनमध्ये पेटंट किंवा कॉपीराईट नावाचा नियमच नाही.
मुंबई : नेलपेंटपासून एरोप्लेनच्या पार्टपर्यंत आणि सेफ्टी पिनपासून (Made In China Products) सेलफोनपर्यंत, चीन जगाचं ‘मॅन्युफॅक्चरिंग हब‘ होऊन बसलं आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात आढळणारी अशी एकही वस्तू नाही, जी चीनमध्ये बनत नसेल. भलेही दर्जाच्या बाबतीत चिनी वस्तू सुमार असतील, मात्र जगभरच्या बाजारपेठा ‘मेड इन चायना’च्या वस्तूंनीच सजतात, हे नाकारुन चालत नाही (Made In China Products).
चिनी वस्तू स्वस्तात मिळतात याचं कारण, चीनमध्ये पेटंट किंवा कॉपीराईट नावाचा नियमच नाही. म्हणजे जर उद्या अॅपलने आयपॅड तयार केला, तर पुढच्या 24 तासात त्याची हुबेहुब कॉपी चीनमध्ये तयार होते. जपानने होंडाची कार बनवली, तर फक्त 15 तासात चीन ते मॉडेल कॉपी करते. म्हणजे संशोधनावर शून्य खर्च. म्हणूनच इतर देशांच्या तुलनेत तुम्ही चिनी शास्रज्ञांची नावं कमी ऐकली असतील. मध्यंतरी अमेरिका-चीनमध्ये जे वाद झाले होते, त्याचं एक प्रमुख कारण चिनी व्यापाराची ही कॉपी-पेस्ट वृत्ती सुद्धा होती.
चीन हा वस्तूच्या दर्जापेक्षा उत्पादनाच्या संख्येवर फोकस करतो. प्रत्येक देशात शिरण्याआधी त्या देशातल्या गरजांचा अभ्यास केला जातो आणि पहिली पाच वर्ष मातीमोल भावानं सामान विकून त्या देशातल्या इतर उत्पादनांना हद्दपार करतो. उदाहरणार्थ, मोबाईल, जेव्हा भारतात नोकिया मोबाईलचा हुकमी ब्रँड होता, तेव्हा चीनने लोकांना चायना मोबाईलचं वेड लावलं.
नोकियाचा कॅमेरा असलेला मोबाईल खरेदीसाठी तेव्हा 3 हजार लागायचे, तेव्हा चीनने 1 हजार रुपयात ड्युअल सीम, ड्युअल कॅमेरा मोबाईल बाजारात उतरवला. नंतर चायना मेड मोबाईल बाजूला करुन चीनने नव्या कंपन्यांना समोर आणलं (Made In China Products).
चीनला कोणतीही वस्तू स्वस्तात कशी विकू शकतो, ते सुद्धा समजून घेऊयात.
चीनमध्ये जगातलं सर्वात स्वस्त मनुष्यबळ आहे. चीनमध्ये कामगार कायदे जवळपास नाहीच्या बरोबर आहेत. तिथलं सरकार स्वतःला साम्यवादी म्हणत असलं, तरी कामगारांसाठी कायदे नसणं हा सर्वात मोठा विरोधाभास आहे. लोकशाही नसल्यामुळे तिकडे रोजगारहमी, बेरोजगारी भत्ता टाईप योजना असण्याचा संबंधच नसतो. म्हणून चीनमध्ये मनुष्यबळही मुबलक आहे.
तिथलं सरकार प्रत्येक कंपनीच्या उभारणीवेळी रस्ता, वीज, पाणी मोफत पुरवते. सुरुवातीचा काही काळ कंपनीला करातून सूट मिळते. निर्यात वस्तूंनाही सवलत दिली जाते, काही दिवसातच कंपनीला मंजुरी मिळते. जमीन केंद्राची म्हणजे कम्युनिस्ट सरकारच्या मालकीची आहे, म्हणून एकाच ठिकाणाहून परवानगी घ्यावी लागते. स्थानिक प्रशासनाकडून कंपनीला परवानगीची गरज नसते. चीनमध्ये पर्यावरवादी आहेत, मात्र एखाद्या कंपनीला विरोध वगैरे सारख्या गोष्टी तिथं ऐकून घेतल्या जात नाहीत.
मात्र, फक्त स्वस्त मनुष्यबळ हेच एक कारण नाही. चीनने कच्च्या मालात स्वतःला स्वयंपूर्ण आणि सोयीचं बनवलं आहे. उदाहरणार्थ, समजा औरंगाबादेत मोटरसायकल तयार होते, तर तिचे टायर्स चाकणच्या कारखान्यातून आणावे लागतील. तिचे लाईट्स इंदूरहून येतील आणि तिचं इंजिन नाशिकमध्ये तयार झालेलं असेल. म्हणजे औरंगाबादेत मोटसायकल फक्त जोडली जाईल. मात्र, चार ठिकाणांहून आणलेल्या तिच्या पार्ट्समुळे तिची किंमत वाढेल.
मात्र, चीनमध्ये उद्योग उभे करताना सर्व गोष्टी या एकाच शहरात उपलब्ध होतील, याची काळजी घेतली गेली आहे. म्हणजे वेळ आणि वाहतुकीवर पैसा खर्च करावा लागणार नाही. म्हणूनच चीन 1 रुपयाला सेफ्टी पिन आणि दोन रुपयाला पेन विकू शकतो. मात्र, हे करताना इतर देशांची उत्पादनं कॉपी करणं हा चीनचा मूळ स्वभाव राहिला आहे. म्हणूनच चिनी वस्तूंबरोबरच चीन सुद्धा बदनाम आहे (Made In China Products).
सव्वाशे कोटी नागरिकांनी चीनची एकही वस्तू वापरु नये, चीन जागेवरच येईल : अजित पवारhttps://t.co/N0FCyGZT0h#AjitPawar #IndiaChinaTension #BoycottChina
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 23, 2020
संबंधित बातम्या :
जळगावात सोन्याचा भाव प्रतितोळा 49 हजारावर, भारत-चीन अस्थिरतेचा सोन्यावर परिणाम