पवार कुटुंब एकत्र येणार का ? अजितदादा म्हणाले की,’पुढचं कोणी पाहीलंय ? आम्ही काही…

महाराष्ट्रात विधानसभेचे रणशिंग केव्हाही फुंकले जाऊ शकते. तरीही अजून निवडणूक आयोगाने अजूनही निवडणूकांच्या तारखांची घोषणा केलेली नाही. महाराष्ट्रात विधानसभेच्या पाच प्रमुख पक्षात निवडणूका होणार आहेत.

पवार कुटुंब एकत्र येणार का ? अजितदादा म्हणाले की,'पुढचं कोणी पाहीलंय ? आम्ही काही...
ajit dada and sharad pawar
Follow us
| Updated on: Sep 25, 2024 | 9:47 PM

Ajit Pawar News : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या उलाढाली सुरु झाल्या आहेत. सर्व पक्ष आपआपली रणनीती आखली जात आहे. या दरम्यान उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख अजितदादा पवार यांनी पुन्हा शरद पवार यांच्याकडे जाणार का या प्रश्नावर नकारार्थी उत्तर दिले आहे. महायुती आपले सरकार स्थापन करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांंनी म्हटलं आहे. पवार कुटुंब पुन्हा एकत्र येईल का ? या प्रश्नावर अजितदादा म्हणाले की पुढचं कोणी पाहीलंय ? आम्ही काही भविष्य सांगणार नाही !

इंडिया टुडेने उपमुख्यमंत्री अजितदादा यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांना तुम्ही पुन्हा तुमचे काका शरद पवार यांच्याकडे जाऊ शकता का ? या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की मी महायुती सरकार सोबत लढणार आहे. राज्यात महायुतीचे सरकार आणण्याची आमचा संपूर्ण प्रयत्न असणार आणि आम्ही आमची जबाबदारी पू्र्ण करू असेही अजितदादा यांनी म्हटले आहे.

आम्ही आता खुप पुढे गेलो आहोत- अजित पवार

अजितदादांना जेव्हा विचारले की बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात तुम्ही तुमच्या पत्नीला उभे केले होते. त्याबद्दल तुम्ही खेद व्यक्ती करीत चुक झाल्याचे म्हटले होते. परंतू तुम्हाला आता शरद पवार यांची साथ सोडल्याचा पश्चाताप वाटत आहे का ? या प्रश्नाला आता जे झाले ते झाले. त्याच्याबद्दल वारंवार विचार करायची गरज नाही. आम्ही आता खुप पुढे गेलो आहोत. आता आम्ही पुढचा विचार करणार असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री तर मला व्हायचंय पण… – अजित पवार

क्या फॅमिली रियूनियन होऊ शकतं का ? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की , ”पुढचं कोणी पाहीलंय ? आम्ही काही भविष्य सांगणारे लोक नाहीत. आम्ही काम करणारे लोक आहोत. आम्हाला काम करायचे आहे. महाराष्ट्राला पुढे आणू इच्छीत आहोत.”  मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे यात काही संशय नाही. परंतू उपमुख्यमंत्री पदाच्या पुढे पोहचू शकलो नाही. मी मुख्यमंत्री होऊ इच्छीत आहे. परंतू पुढे जाऊ शकत नाही. मला संधी मिळत नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखविली आहे.

'बाजारबुणगे, हिंमत असेल तर...', ठाकरेंचा कोणाला अप्रत्यक्षपणे इशारा?
'बाजारबुणगे, हिंमत असेल तर...', ठाकरेंचा कोणाला अप्रत्यक्षपणे इशारा?.
'अक्षय शिंदे कोणी संत नव्हता, तो..', शर्मिला ठाकरे नेमक काय म्हणाल्या?
'अक्षय शिंदे कोणी संत नव्हता, तो..', शर्मिला ठाकरे नेमक काय म्हणाल्या?.
जरांगेंचं उपोषण स्थगित, सलग 8 दिवस उपोषण केल्यानंतर 9व्या दिवशी माघार?
जरांगेंचं उपोषण स्थगित, सलग 8 दिवस उपोषण केल्यानंतर 9व्या दिवशी माघार?.
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी कोर्टाने केले 'हे' सवाल
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी कोर्टाने केले 'हे' सवाल.
'हे न पटण्यासारखं...', मुंबई हायकोर्टानं सरकारी वकिलांनाच फटकारलं
'हे न पटण्यासारखं...', मुंबई हायकोर्टानं सरकारी वकिलांनाच फटकारलं.
मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली; शिंदे हा नालायक...
मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली; शिंदे हा नालायक....
'पवार-ठाकरे-काँग्रेसकडून लिहून घ्यावं...', फडणवीसांचं जरांगेंन आव्हान
'पवार-ठाकरे-काँग्रेसकडून लिहून घ्यावं...', फडणवीसांचं जरांगेंन आव्हान.
भाऊ की भाई? शिंदे-फडणवीस समर्थकांमध्ये एन्काऊंटरच्या श्रेयावरुन वॉर?
भाऊ की भाई? शिंदे-फडणवीस समर्थकांमध्ये एन्काऊंटरच्या श्रेयावरुन वॉर?.
अक्षय शिंदेचं एन्काऊंटर पोलिसांच्या व्हॅनमध्येच... पण त्याआधी काय घडलं
अक्षय शिंदेचं एन्काऊंटर पोलिसांच्या व्हॅनमध्येच... पण त्याआधी काय घडलं.
आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर राऊतांसह राजकीय नेत्यांची फायरिंग
आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर राऊतांसह राजकीय नेत्यांची फायरिंग.