अझीम प्रेमजींची दानत, भारतातील सर्वात दानशूर उद्योगपती, कोरोना संकटातही तब्बल 7,904 कोटी रुपये दान
कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक गणितं बिघडली, व्यापार ठप्प झाले, उद्योगधंदे बंद झाले. मात्र, या काळातही भारतातील उद्योगपती अझीम प्रेमजी यांनी तब्बल 7 हजार 904 कोटी रुपयांचं दान केल्याची माहिती समोर आली आहे.
बंगळुरु : कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक गणितं बिघडली, व्यापार ठप्प झाले, उद्योगधंदे बंद झाले. मात्र, या काळातही भारतातील उद्योगपती अझीम प्रेमजी यांनी तब्बल 7 हजार 904 कोटी रुपयांचं दान केल्याची माहिती समोर आली आहे. या आकड्याप्रमाणे त्यांनी कोरोनाचा प्रकोप होत असलेल्या 2020 या वर्षात दिवसाला 22 कोटी रुपये दान केले आहेत. अझीम प्रेमजी यांच्या या दानातील सर्वाधिक वाटा हा त्यांच्या अझीम प्रेमजी फाऊंडेशनलाच गेलेला आहे. ही संस्था शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी काम करते (Wipro founder Azim Premji donate 7,904 crore for Social cause in FY20).
दरम्यान, मार्च 2019 मध्ये अझीम प्रेमजी यांनी आपल्या संपत्तीचा 34 टक्के भाग अझीम प्रेमजी फाऊंडेशनला दिली होता. ही रक्कत जवळपास 52 हजार 750 कोटी रुपये होती. अझीम प्रेमजी फाऊंडेशनने याआधी कोरोना साथीरोगाशी लढा देण्यासाठी मदत म्हणून पीएम केअरला देखील 1,000 कोटी रुपयांचे दान केले होते. प्रेमजी यांनी 2019 मध्ये आपल्या संपत्तीतील 34 टक्के भाग फाऊंडेशनला दान केल्यानंतर त्यांची संपत्ती कमी होऊन श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत ते खाली आले होते, असं निरिक्षण फोर्ब्सने नोंदवलं होतं.
प्रेमजी यांच्याखालोखाल एचसीएलचे (HCL) प्रमुख शिव नदार यांनी 795 कोटी, भारतातील आणि आशियाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी 458 कोटी रुपये दान केले आहे. मागील 2 वर्षात 10 कोटी रुपयांपेक्षा अधिकचं दान देणाऱ्या उद्योगपतींची संख्या 37 वरुन 78 वर पोहचली आहे.
दान करणाऱ्या भारतातील टॉप 10 उद्योगपतींमध्ये आदित्य बिरला ग्रुपचे कुमार मंगलम बिरला (Aditya Birla Group’s Kumar Mangalam Birla) – 276 कोटी, वेदांताचे अनिल अग्रवाल (Vedanta’s Anil Agarwal) – 215 कोटी, परिमल ग्रुपचे अजय परिमल (Primala Group’s Ajay Piramal) – 196 कोटी, नंदन निलेकनी (Nandan Nilekani), हिंदुजा ब्रदर्स (Hinduja Brothers), गौतम अडाणी (Gautam Adani) आणि राहुल बजाज आणि कुटुंबीय (Rahul Bajaj and family) यांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या :
Corona : ना पीएम, ना सीएम फंडला देणगी, विप्रो स्वत:च कोरोना लढाईवर तब्बल 1,125 कोटी खर्च करणार
दानशूर अझीम प्रेमजी! 52 हजार कोटींहून अधिक रक्कम गरिबांसाठी दान
Wipro founder Azim Premji donate 7,904 crore for Social cause in FY20