मुलीच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या महिलेची साक्ष चिदंबरम यांना महागात

साडे चार वर्षांपूर्वी चर्चेत आलेल्या इंद्राणी मुखर्जीने सरकारी साक्षीदार (P Chidambaram arrested) बनण्यास होकार दिला आणि चिदंबरम यांच्या अडचणी वाढल्या. इंद्राणी मुखर्जी सध्या स्वतःच्या मुलीच्या हत्येप्रकरणी तुरुंगात आहे.

मुलीच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या महिलेची साक्ष चिदंबरम यांना महागात
Follow us
| Updated on: Aug 22, 2019 | 5:56 PM

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम (P Chidambaram arrested) यांना सीबीआयने अटक केली. ही अटक करण्यात एका अशा व्यक्तीची साक्ष (P Chidambaram arrested) महत्त्वाची ठरली, जी व्यक्ती सध्या तुरुंगात आहे. साडे चार वर्षांपूर्वी चर्चेत आलेल्या इंद्राणी मुखर्जीने सरकारी साक्षीदार (P Chidambaram arrested) बनण्यास होकार दिला आणि चिदंबरम यांच्या अडचणी वाढल्या. इंद्राणी मुखर्जी सध्या स्वतःच्या मुलीच्या हत्येप्रकरणी तुरुंगात आहे.

कोण आहे इंद्राणी मुखर्जी?

ऑगस्ट 2015 मध्ये मुंबई पोलिसांनी शीना बोरा हत्या प्रकरणात इंद्राणी मुखर्जीला अटक केली. इंद्राणी मुखर्जी आणि तिचा प्रियकर सिद्धार्थ दास यांची मुलगी शीना बोराच्या हत्येचं प्रकरण जेव्हा सीबीआयला वर्ग करण्यात आलं, तेव्हा इंद्राणी मुखर्जीला आरोपी करण्यात आलं.

सिद्धार्थ दास आणि इंद्राणी मुखर्जी यांचे संबंध 1986 ते 1989 या काळात कायम होते. 1993 मध्ये इंद्राणी मुखर्जीने पहिलं लग्न संजीव खन्ना नावाच्या व्यक्तीशी केलं आणि 2002 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. इंद्राणीने दुसरं लग्न पीटर मुखर्जीशी केलं, जे 2017 पर्यंत चाललं. पीटर मुखर्जी 1997 ते 2007 या काळात स्टार इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते.

2007 मध्ये इंद्राणी मुखर्जीसोबत मिळून पीटर मुखर्जी यांनी आयएनएक्स मीडियाची स्थापना केली. पण दोघांनी 2009 मध्ये कंपनी सोडली. या कामापूर्वी इंद्राणीने एचआर कन्सल्टन्ट म्हणूनही काम केलं होतं.

मुलीची हत्या

पीटर मुखर्जी यांचा एक मुलगा, ज्याचं नाव राहुल मुखर्जी होतं. राहुल आणि शीना यांच्यात जवळीक वाढली, ज्यामुळे इंद्राणी आणि पीटर यांना त्रास सुरु झाला. शीना मुंबई मेट्रोमध्ये काम करत होती, पण ती अचानक 24 एप्रिल 2012 रोजी गायब झाली. तिचा मृतदेह रायगड जिल्ह्यातील पेनमध्ये आढळून आला. मृतदेहाची ओळख पटली नाही, पण 2015 मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर ओळखही पटवण्यात आली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी आणि त्यांच्या चालकाला अटक करण्यात आली. शीना ही इंद्राणीकडून मुंबईत एक फ्लॅट मागत होती आणि तिला ब्लॅकमेल करत होती असं नंतर सीबीआयने सांगितलं. फ्लॅट न दिल्यास आपण दोघी बहिणी नव्हे, तर मायलेकी आहोत, असं जाहीरपणे सांगेन, असं सांगून इंद्राणीला ब्लॅकमेल केलं जात असल्याचं समोर आलं. शिवाय राहुलसोबत संबंध ठेवल्यामुळेही इंद्राणी आणि पीटर नाराज असल्याचं सांगितलं जातं. अखेर 50 पेक्षा जास्त साक्षीदार तपासल्यानंतर पीटर आणि इंद्राणी दोघेही अजूनपर्यंत तुरुंगात आहेत.

सरकारी साक्षीदार

हत्येप्रकरणी आरोपी असेलेली इंद्राणी आता साक्षीदार बनली आहे. 2006 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री पी चिदंबरम यांची भेट घेतल्याचं इंद्राणी आणि पीटर यांनी सीबीआय-ईडीला सांगितलंय. यावेळी चिदंबरम यांनी मुलगा कार्ती चिदंबरमला व्यवसायात मदत करण्याचा सल्ला दिल्याचीही साक्ष देण्यात आली. पण कार्ती चिदंबरम यांनी अशी कोणती भेट झाल्याचं नाकारलं आहे.

चिदंबरम यांच्याविरोधातील सर्वात मोठा साक्षीदार इंद्राणी मुखर्जी ठरण्याची शक्यता आहे. 17 फेब्रुवारी रोजी इंद्राणीचा जबाब कोर्टात नोंदवण्यात आला होता. कार्ती चिदंबरम यांनी आपल्याकडून 10 लाख डॉलरची लाच मागितल्याचा आरोप इंद्राणीने केला होता. ही लाच देण्यासाठी अगोदर इंद्राणी कार्ती यांच्या कंपनीत सहभागी झाली. यानंतर बनावट नुकसान भरपाई म्हणून कार्ती यांच्या दोन कंपन्या ASCPL आणि INX मीडियासाठी सात लाख डॉलरचे चार चलन तयार करण्यात आले. कार्ती यांना फेब्रुवारी 2018 मध्ये अटक झाल्याचं हेच ते प्रकरण आहे.

कार्ती यांना आयएनएक्स मीडियासाठी 305 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक मिळाली, तर परवानगी फक्त 5 कोटी रुपयांची होती, असा सीबीआयचा दावा आहे. वडिलांच्या पदाचा वापर करुन हा मार्ग कार्ती यांनी सुकर केला, असा आरोप आहे.

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.