महिलांनो मुंबईत घर खरेदी करायची तर पाहा खास सुट, ‘पिंक संडे’ची काय ऑफर पाहा

या प्रॉपर्टी मेळाव्यात मेळाव्यात १०० हून अधिक बिल्डर्स आणि पाच हजार ठिकाणांवर पाचशे हून अधिक प्रॉपर्टीचे प्रदर्शन भरवले आहे. या प्रदर्शनाला भेट देणारे ग्राहक २५ हून अधिक वित्तीय संस्थांच्या मदतीने आपल्या गरजेनुसार आणि आपल्या बजेटनुसार विविध प्रॉपर्टी पाहून आणि घर खरेदीचा करार करु शकतात.

महिलांनो मुंबईत घर खरेदी करायची तर पाहा खास सुट, 'पिंक संडे'ची काय ऑफर पाहा
Follow us
| Updated on: Jan 14, 2025 | 5:40 PM

महिला आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. महिलांच्या सशक्तीकरणासाठी अनेक योजना सरकार काढत आहेत. आता महिलांकडून घरांची खरेदी वाढण्यासाठी महाराष्ट्राच्या CREDAI-MCHI ने खास पाऊल उचलले आहे. या संस्थेने मुंबईत भरलेल्या प्रॉपर्टी मेळाव्यात महिलांच्या द्वारे होणाऱ्या घर खरेदीवर दोन लाख रुपयांची अतिरिक्त सूट दिली आहे. ही ऑफर पिंक संडे मोहिमेचा एक भाग आहे. या ऑफरमध्ये बांधकाम व्यावसायिकांकडून दिलेल्या सुविधांमध्ये आणखी वाढ होणार आहे. ही ऑफर केवळ रविवारच्या खरेदीवर दिलेली आहेय हे प्रदर्शन १७ ते १९ जानेवारी दरम्यान आहे. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर मध्ये हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

येथे पाहा पोस्ट –

हे सुद्धा वाचा

दहा मिनिटात घराचे बुकींग

हा प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये घर खरेदी सोपी करण्यात आली आहे. ज्यात तुम्ही अगदी दहा मिनिटांत घर बुक करु शकता अशी स्कीम्स आम्ही आणली असल्याचे प्रॉपर्टी मेळाव्याचे आयोजक CREDAI-MCHI चे अध्यक्ष डोमिनिक रोमेल यांनी म्हटले आहे. एक्स्पोच्या मदतीने घर खरेदी सोपी बनली आहे. मुळात प्रदर्शन भरविण्याचा उद्देश्यच घर खरेदी सोपी करणे आणि हवे ते हव्या त्या बजेट घर घेता यावे असा असल्याचे क्रेडाई नेशनल के अध्यक्ष बोमन इराणी यांनी म्हटले आहे. यात रिअल इस्टेटमधील इनोव्हेशनवर देखील लक्ष ठेवण्यात आले आहे.

या प्रदशनात घरे खरेदी करणाऱ्यांसाठी खास ऑफर देखील देण्यात आली आहे. ज्यात स्टँप्ट ड्युटी आणि जीएसटी पासून सूट आणि १८ लाखांपर्यंत विशेष सवलत देण्यात येणार असल्याचे CREDAI-MCHI चे सचिव धवल अजमेरा यांनी म्हटले आहे.

पिंक संडे मोहिम

या प्रदर्शनात प्रथमच १९ जानेवारी रोजी ‘पिंक संडे’नावाने खास दिवस साजरा केला जात आहे. ज्या महिलांना स्वत:च्या नावाने घर खरेदी करायची असेल तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आखली आहे. या CREDAI-MCHI महिला निवास योजनेंतर्गत महिलांना दोन लाखांची अतिरिक्त सूट दिली आहे.

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...