शिर्डीतील लग्नात ‘महिलाराज’, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश
शिर्डीत एक अनोखे लग्न पाहायला मिळाले (women power in wedding) आहे. या लग्नात महिलाराज आहे. पुरुषप्रधान संस्कृती ऐवजी या लग्नात महिला प्रधान संस्कृतीचे दर्शन घडलं आहे.
शिर्डी : शिर्डीत एक अनोखे लग्न पाहायला मिळाले (women power in wedding) आहे. या लग्नात महिलाराज आहे. पुरुषप्रधान संस्कृती ऐवजी या लग्नात महिला प्रधान संस्कृतीचे दर्शन घडलं आहे. संपूर्ण लग्नामध्ये प्रमुख सर्व कामं ही महिलांकडे होती. लग्नपत्रिकेपासून तर विवाहाच पौरहित्य करण्यापर्यंत फक्त महिला आणि महिलाच होत्या. त्यामुळे हे लग्न जिल्ह्यात चर्चेचा विषय बनले (women power in wedding) आहे.
लोणी येथे म्हस्के आणि गायकवाड या कुंटुंबात हा अनोखा विवाह सोहळा पार पडला. दोन्ही कुटुंबांनी ठरवलं विवाह करताना सर्व मान हा महिलांना मिळायला हवा. त्यामुळे लग्नपत्रिकेत अगोदर घरातील महिला अन त्यानंतर पुरूष, निमंत्रक ही महिला, प्रेषकही महिला होत्या. विशेष म्हणजे या पत्रिकेत ठळक अक्षरात लिहिलं गेलं बेटी बचाओ! बेटी पढाओ!
लग्निपत्रिकेत केवळ महिलांच्या नावाला प्राधान्य होते. महिला वर्गाने संकल्प केला अन तो सिद्धीस देखील नेला. संचिता म्हस्के आणि अनिकेत गायकवाड यांच्या विवाहाच्या लग्नाची ही गोष्ट आहे. विवाह मंडपाबाहेर स्वागत करणाऱ्या महिला, कार्यक्रमात निवेदकही महिला, गायकही महिला अन मंगलाष्टके म्हणनारी देखील महिला होती. हे लग्न पाहून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी देखील वधू-वर पक्षाच या धाडसाबद्दल कौतुक केलं. महिलांना केवळ आरक्षण नको तर सुरक्षा हवी अस मत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी मांडले.
लग्न, वास्तुशांती किंवा इतर कोणता कार्यक्रम असो जिथं तिथं पुरूषप्रधान संस्कृतीचं दर्शन घडतं. मात्र या विवाहसोहळ्यात मामा ऐवजी मीमींनीच आंतरपाट धरला होता. महिला पौराहीत्य करणाऱ्या गायत्री कुलकर्णी आणि सौ. धर्माधिकारी यांच्या सुमधूर मंगलाष्टकांच्या स्वरात हा विवाह संपन्न झाला. विवाहमंडपात देखील पुरूषांएवजी फक्त महिलाराजच दिसुन आला. जेवन वाढण्यासाठी देखील महिलांची वर्णी दिसून आली. या अनोख्या विवाह सोहळ्यासाठी हजारो वऱ्हाडी मंडळीनी हजेरी लावली होती.
हा आगळा वेगळा विवाह सोहळा वधू-वरासाठी आनंददायी ठरला. महिलांना प्राधान्य दिल्याने मोठा आनंद होत असल्याचं नववधू संचिता आणि वर अनिकेत यांनी सांगितलं.