9 मुली, दोन मुलांनंतरही महिला 17 व्या वेळी गर्भवती, बीडमध्ये आरोग्य यंत्रणेचा बोजवारा

पालावर राहून भंगार वेचून उदरनिर्वाह करणारी एक महिला तब्बल 17 व्या वेळी गर्भवती (Pregnancy) राहिली आहे. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा (Health Organisation) खडबडून जागे झाले आहेत.

9 मुली, दोन मुलांनंतरही महिला 17 व्या वेळी गर्भवती, बीडमध्ये आरोग्य यंत्रणेचा बोजवारा
Follow us
| Updated on: Sep 09, 2019 | 2:08 PM

बीड : पालावर राहून भंगार वेचून उदरनिर्वाह करणारी एक महिला तब्बल 17 व्या वेळी गर्भवती (Pregnancy) राहिली आहे. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा (Health Organisation) खडबडून जागे झाले आहेत. बीडमधील (Beed) माजलगाव येथील केसापुरी कॅम्प येथे ही महिला वास्तव्यास आहेत. एका महिला सामाजिक कार्यकर्त्याकडून ही घटना उघडकीस आली. त्यामुळे आरोग्य यंत्रणा किती कुचकामी आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. दरम्यान ही घटना समजल्यानंतर आरोग्य विभागाचे (Health Department) एक पथक महिलेच्या पालावर दाखल झाले आहे.

माजलगाव शहरापासून दोन किलोमीटर अंतरावरील केसापुरी वसाहत परिसरात मालोजी देवीदास खरात हे पाल ठोकून वास्तव्य करीत आहेत. त्यांची पत्नी लंकाबाई (नाव बदलले) आठ महिन्याच्या गरोदर असून त्या आता 17 व्या वेळी गर्भवती आहेत. लंकाबाई यांना अगोदर नऊ मुली, दोन मुलं अशी 11 अपत्य आहे. यापूर्वी सहा अपत्य बाळंतपण झाल्यानंतर दगावल्याचे त्यांनी सांगितले. यातील 4 मुलींची आणि एका मुलाचे लग्न झाले आहे. यानंतरही त्या 17 व्यांदा गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे. आरोग्य पथकाने त्यांच्या रक्ताच्या तपसण्या, सोनोग्राफी तपासणी केली असता सर्व रिपोर्ट सकारात्मक आहेत. मात्र तरी जोखमीची माता असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

आरोग्य यंत्रणा ग्रामीण भागात पोहोचल्याचा डंका सरकारकडून वाजवण्यात येत असला, तरी माजलगावच्या या घटनेकडे पाहून आरोग्य यंत्रणेचं पितळ उघडे पडले आहे. त्या 17 व्या वेळी गरोदर असताना त्यांची वेळीच चौकशी करून तिला कुटुंब नियोजनासाठी परावृत्त का करण्यात आले नाही हा मोठा प्रश्न आहे.

लंकाबाईच्या घरात दर सहा महिन्याला पाळणा हलतो. त्यामुळे तिला शारीरिक त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान लंकाबाईच्या पालावर अद्याप कसलीच आरोग्य यंत्रणा पोहचली नसल्याने त्या अज्ञानी आहे. त्यामुळेच त्या 17 व्या वेळी गरोदर राहिल्या आहे

प्रसूती दरम्यान रुग्णालयात दाखल झालेल्या गरीब मातांना आरोग्य विभागाकडून मानधन मिळते. मात्र माजलगाव येथील आरोग्य केंद्राकडून मानधन देण्यात येत नसल्याने लंकाबाई तिथून लवकर जातात. त्यानंतर त्या भंगार वेचण्याच्या कामाला लागून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. याला सर्वस्वी आरोग्य यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत

विज्ञानात एकीकडे उत्तुंग गरुड भरारी सुरू आहे, आरोग्य यंत्रणादेखील मोठी समर्थ आणि वाडी तांड्यापर्यंत पोहोचल्याचा गवगवा केला जातो. मात्र माजलगावाच्या या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेला एक चपराक बसली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.