श्रीलंका बॉम्बस्फोट चौकशीदरम्यान महिलेने स्वतःसह मुलांना बॉम्बने उडवले

(इस्‍लामिक स्‍टेटच्या AMAQ या एजन्सीने प्रसिद्ध केलेल्या आत्मघातकी दहशतवाद्यांचा फोटो) कोलंबो : श्रीलंकेतील आत्मघातकी बॉम्बस्फोट प्रकरणाची चौकशीदरम्यान एका महिलेने स्वतःसह मुलांना बॉम्बने उडवल्याची घटना घडली. स्‍पेशल टास्‍क फोर्स तपासासाठी संशयितांच्या घरी गेली होती. त्यावेळी संशयितांच्या पत्नीने स्वतःसह मुलांना बॉम्बस्फोट करुन उडवले. या स्फोटात 3 पोलीस कमांडोंचाही मृत्यू झाला. पोलिसांनी संबंधित कुटुंबीयांच्या नातेवाईकांनाही ताब्यात घेतले आहे. […]

श्रीलंका बॉम्बस्फोट चौकशीदरम्यान महिलेने स्वतःसह मुलांना बॉम्बने उडवले
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

(इस्‍लामिक स्‍टेटच्या AMAQ या एजन्सीने प्रसिद्ध केलेल्या आत्मघातकी दहशतवाद्यांचा फोटो)

कोलंबो : श्रीलंकेतील आत्मघातकी बॉम्बस्फोट प्रकरणाची चौकशीदरम्यान एका महिलेने स्वतःसह मुलांना बॉम्बने उडवल्याची घटना घडली. स्‍पेशल टास्‍क फोर्स तपासासाठी संशयितांच्या घरी गेली होती. त्यावेळी संशयितांच्या पत्नीने स्वतःसह मुलांना बॉम्बस्फोट करुन उडवले. या स्फोटात 3 पोलीस कमांडोंचाही मृत्यू झाला. पोलिसांनी संबंधित कुटुंबीयांच्या नातेवाईकांनाही ताब्यात घेतले आहे.

श्रीलंकेत झालेल्या साखळी स्फोटाची जबाबदारी इस्‍लामिक स्‍टेटने घेतली आहे. मात्र, श्रीलंका सरकारने नॅशनल तौहीद जमात (NTJ) या संघटनेचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला आहे. श्रीलंकेचे संरक्षण मंत्री म्हणाले, ‘हे बॉम्बस्फोट न्‍यूझीलंडमधील मशिदींवर 15 मार्चला झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी करण्यात आले आहेत. श्रीलंकेतील एएफपी या न्यूज पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार, कोलंबोतील प्रसिद्ध मसाला व्‍यापाऱ्याच्या 2 मुलांनी हे आत्मघातकी स्फोट केल्याची शक्यता वर्तवली आहे.

‘एका भावाने पत्ता लपवला, दुसऱ्याने सांगून टाकला’

तपास अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे व्यापाऱ्याच्या एका मुलाने हॉटेलमध्ये प्रवेश करताना आपले नाव लपवले होते, मात्र दुसऱ्याने आपला खरा पत्ता सांगून टाकला होता. स्पेशल टास्क फोर्स या पत्त्यावर गेली असता एका संशयिताच्या पत्नीने बॉम्बस्फोट घडवत आपल्या मुलांसह आत्महत्या केली. या स्फोटात 3 पोलीस कमांडोंचा जीव गेला. दरम्यान, पोलिसांनी संबंधित कुटुंबाच्या अनेक नातेवाईकांनाही ताब्यात घेतले आहे.

श्रीमंत कुटुंबातील मुलांनी दहशतवादाचा मार्ग कसा अवलंबला?

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले, ‘कुटुंबातील आरोपी दहशतवादी सेलचा भाग आहेत. त्यांच्याकडे पैसेही सापडले आहे. त्यांनी त्यांच्या नातेवाईकांनाही प्रभावित केले आहे.’ दोन्ही भावांच्या आई-वडिलांचा मात्र, अद्यापही पत्ता लागलेला नाही. आत्मघातकी स्फोट घडवून आणणाऱ्या दोघांनाही हे करण्यासाठी तयार करण्यात विदेशी हस्तक्षेप होता की नाही याचाही तपास केला जात आहे. एका श्रीमंत कुटुंबातील मुलांनी दहशतवादाचा मार्ग कसा अवलंबला याचाही तपास केला जाणार आहे. दोन्ही भाऊ नॅशनल तौहीद जमात (NTJ) संघटनेचे प्रमुख सदस्य होते, असेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, रविवारी (21 एप्रिलला) श्रीलंकेच्या साखळी स्फोटात झालेल्या मृतांची संख्या वाढून 321 पर्यंत पोहचली आहे. तसेच 500 लोक जखमी झाले आहेत. हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीलंकेने मंगळवारी राष्ट्रीय दुखवट्याचीही घोषणा केली होती.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.