लिंबोटी धरण तुडुंब, तरीही अहमदपुरात 25 दिवस पाणीच नाही, नळाला लिंबू मिरची बांधून अनोखं आंदोलन

नगर पालिकेच्या कारभाराला कंटाळून अहमदपूरमधील महिलांनी नळांना भानामती झाल्याचं सांगत प्रतिकात्मक आंदोलन केलं (Womens Bhanamati protest in Latur).

लिंबोटी धरण तुडुंब, तरीही अहमदपुरात 25 दिवस पाणीच नाही, नळाला लिंबू मिरची बांधून अनोखं आंदोलन
Follow us
| Updated on: Jun 24, 2020 | 3:18 PM

लातूर : ऐन पावसाळ्यात लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरात पाणी टंचाईने हाहाकार माजला आहे. अहमदपूरमध्ये मागील 25 दिवसांपासून नळाला पाणीच आलेले नाही. विशेष म्हणजे अहमदपूरपासून लिंबोटी धरण केवळ 10-15 किलोमीटर अंतरावर आहे. हे धरण तुडूंब भरलेले आहे. मात्र, असं असतानाही अहमदपूरला 25 दिवसांपासून पाणी नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

अहमदपूर नगर पालिकेच्या कारभाराला कंटाळून रुद्र महिला मंडळाच्या महिलांनी अहमदपूरमधील नळांना भानामती झाल्याचं सांगत प्रतिकात्मक आंदोलन केलं (Womens Bhanamati protest in Latur). या महिलांनी अहमदपूर शहरातील नळांवर जाऊन लिंबू, मिरची, बिबे बांधत आहेत. अक्षरशः नगर पालिकेच्या उदासीन मानसिकतेने महिलांची डोकेदुखी वाढली आहे. अगोदरच लॉकडाऊन आणि त्यात घरात पाणीच नाही. यामुळे चिडलेल्या महिलांनी नळांना लिंबू, मिरची आणि बिबे बांधून नगर पालिकेचा कारभार चव्हाट्यावर आणला आहे. आता किमान या प्रतिकात्मक आंदोलनानंतर तरी नगर पालिकेला जाग येईल, अशी अपेक्षा या महिला व्यक्त करत आहेत.

लिंबोटी धरणावरुन अहमदपूरसाठी पाणी पुरवठ्याची लाईन, अंतर्गत पुरवठा योजना आणि जलकुंभ सगळं काही आहे. मग हे सर्व असताना लिंबोडी धरणातील हे पाणी नेमकं कुठं मुरतंय याचं उत्तर मागितलं जात आहे. हे उत्तर खरंतर नगरसेवकांनी नगर पालिकेला विचारणं आवश्यक आहे. पण या स्थितीत नगरसेवकही शांत बसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता अहमदपूरच्या पाणी पुरवठ्याला कोणी वाली आहे की नाही हाच सवाल उपस्थित होत आहे. हाच सवाल पाण्याची जबाबदारी असलेल्या या संतप्त महिला नळाला लिंबू-मिरची आणि बिब्बे नळाला बांधून विचारत आहेत.

हेही वाचा :

Gopichand Padalkar | शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना : गोपीचंद पडळकर

4 आर्टिस्ट, 2292 रोपटी प्रेक्षकाच्या रुपात, प्रत्येक गाण्याला डौलत-डुलत प्रतिसाद

7 लाख कोटीचा व्यवहार, चीनसोबतचे 70 वर्षांचे संबंध उद्ध्वस्त, भारतात कोणत्या क्षेत्रात किती भागीदारी?

Womens Bhanamati protest in Latur

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.