Women’s Day Special : बारामतीत एकदिवसीय महिला ग्रामपंचायत, तर अमरावतीत पोलीस स्टेशनचा ताबा महिला पोलिसांकडे

सपकळवाडी ग्रांमपंचायतीचा कारभार एक दिवसासाठी गावातील युवतींच्या हाती, तर अमरावतीत पोलीस स्टेशनचा ताबा महिला पोलिसांकडे देण्यात आला

Women's Day Special : बारामतीत एकदिवसीय महिला ग्रामपंचायत, तर अमरावतीत पोलीस स्टेशनचा ताबा महिला पोलिसांकडे
Follow us
| Updated on: Mar 08, 2020 | 7:39 PM

बारामती : जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत इंदापूर (Women’s Day Special Story) तालुक्यातल्या सपकळवाडी ग्रांमपंचायतीचा कारभार एक दिवसासाठी गावातील युवतींच्या हाती देण्यात आला. तसेच, त्यांना प्रशासकीय कामकाजाची माहिती देण्यात आली. अलीकडच्या काळात युवती आणि महिलांचा राजकारणातील सहभाग वाढत असताना त्यांना थेट ग्रामपंचायतीच्या कामकाजात सामावून घेत एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला.

वाजतगाजत गावातून मिरवणूकीसह या

पहाटेच्या शपथविधीवर अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

(Women’s Day Special Story) ग्रामपंचायतीत दाखल झाल्या. त्यानंतर अगदी सरपंचांपासून ते ग्रामपंचायत सदस्यांपर्यंत सर्वजणी आपल्या पदाचा कार्यभार घेत मासिक सभा आणि ग्रामसभेला सामोऱ्या गेल्या. एकूणच हा सर्व कारभार सगळ्या युवती करत आहेत, हे पाहून इंदापूर तालुक्यातल्या सपकळवाडी गावाला नवल वाटलं.

हेही वाचा : Women’s Day : मुलींचा अनोख्या पध्दतीने सन्मान, घरच्या नेमप्लेटला मुलीचे नाव

जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून येथील ग्रामपंचायतीनं पुढाकार घेत महिलादिनी अभिरुप ग्रामपंचायत स्थापन केली. एक दिवसाचा कार्यभार युवतींकडे दिला.

सरपंच म्हणून नम्रता पृथ्वीराज सपकळ, उपसरपंच म्हणून प्राजक्ता राजेंद्र कांबळे, सदस्य सायली चंद्रकांत सपकळ, अमिशा मोहन साबळे, विशाखा चांगदेव भुजबळ, वैष्णवी सचिन पवार, रुतुजा अंकुश चव्हाण, ग्रामसेवक म्हणून किर्ती किरण सपकळ, पोलीस पाटील म्हणून दिव्या संतोष सपकळ, तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून अक्षता मिनीनाथ सपकळ यांनी दिवसभरासाठी काम काज पाहिले.

यावेळी अभिरूप ग्रामपंचायत सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा घेण्यात आली. यावेळी सदस्यांनी मासिक सभेत विषय मांडले. सरपंच यांनी त्यावर तातडीने निर्णय घेतले. तसेच, महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.

आजच्या कार्यक्रमात महिलांनी वैयक्तिक आणि गावातील सामाजिक प्रश्न मांडले. विद्यमान सरपंच सचिन सपकळ यांनी सर्व सदस्यांचे स्वागत केले आणि पदभार देण्याकरिता अभिरुप सरपंचांना स्वतःच्या खुर्चीवर बसवले.

अमरावतीत महिला पोलिसांकडून एका दिवसासाठी संपूर्ण पोलीस स्टेशनचा ताबा

अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर पोलीस स्टेशनमध्ये आज जागतिक महिला दिनानिमित्त संपूर्ण महिला पोलिसांनी पोलीस स्टेशनचे कामकाज पाहिले. अचलपूर येथील महिला पोलीस उपनिरीक्षक येथील पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी एक दिवसासाठी कार्यभार सांभाळन्यास दिला होता.

एवढेच नाही, तर येथील गोपनीन विभाग, स्टेशन डायरी, वाहन चालकासह आदी विभागही संपूर्ण महिलांनी हाताळलेत. तर, एक दिवसासाठी पोलीस स्टेशनचा संपूर्ण कार्यभार सांभाळायला (Women’s Day Special Story) मिळाल्याने महिला पोलीस उपनिरीक्षकांनी आनंद व्यक्त केला.

संबंधित बातम्या :

पहाटेच्या शपथविधीवर अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

आधी आदित्य ठाकरेंचा ‘रेशीम कीडा’ उल्लेख, आता रश्मी ठाकरेंबद्दल अमृता फडणवीस म्हणतात….

इच्छाशक्ती असेल तर कॅन्सरवरही मात करता येते, आबांच्या आठवणीने अजित पवार भावूक

कोरोनाचा चिकन बाजाराला फटका, 60 टक्के मांसाहारप्रेमींची चिकनकडे पाठ

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.