Corona World News | रशियाची लस माकडांनाही देणार नाही, अमेरिकेने लसीची खिल्ली उडवली

रशियाची लस ही माणसांना तर सोडा, अमेरिकेतल्या माकडांना सुद्धा देणार नाही, अशा शब्दात अमेरिकेनं रशियन लसीची खिल्ली उडवली आहे.

Corona World News | रशियाची लस माकडांनाही देणार नाही, अमेरिकेने लसीची खिल्ली उडवली
Follow us
| Updated on: Aug 14, 2020 | 11:09 PM

मुंबई : कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागतो आहे (World Corona Virus News). या आजारावर औषध शोधण्याचं, त्याची चाचणी करुन लवकरात लवकर ते औषध सामान्य माणसांसाठी उपलब्ध करवून देण्याचा प्रयत्न जगातील अनेक देश करत आहेत. भारतातही त्यासाठी मोठे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, रशियाने कोरोनावरील लस सोधल्याचा दावा केला आहे. कोरोनामुळे जगात अनेक मोठे बदल पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर जगभरात घडत असलेल्या घडामोडींचा एक आढावा (World Corona Virus News)

अमेरिकेकडून रशियाने शोधलेल्या लसीची थट्टा

अमेरिकेने रशियाने शोधलेल्या लसीची थट्टा केली आहे. रशियाची लस ही माणसांना तर सोडा, अमेरिकेतल्या माकडांना सुद्धा देणार नाही, अशा शब्दात अमेरिकेनं रशियन लसीची खिल्ली उडवली आहे. ज्या वेगाने रशियाने लस विकसीत केली. ते अतिशय गंभीर आहे. त्यामुळे रशियाच्या लसीला फार महत्त्व देण्याची गरज नसल्याचंही अमेरिकेने म्हटलं.

लेबनॉनच्या मदतीला भारत धावला

लेबनॉनच्या मदतीला भारत धावला आहे. भारताकडून 58 मेट्रिक टन आपात्कालीन साहित्य लेबनॉनना दिलं गेलं. अमोनियम नायट्रेटचा स्फोट होऊन लेबनॉनमध्ये भीषण हानी झाली. कोरोनामुळे आधीच रुग्णालयं व्यस्त आहेत. त्यात स्फोटामुळे जखमी झालेल्या 4 हजार लोकांवरही उपचार केले जात आहेत.

सामान्य लोकांना वाचता येईल, अशाच अक्षरात प्रिस्क्रिप्शन लिहा, न्यायालयाचे आदेश

सामान्य लोकांना वाचता येईल, अशाच अक्षरात प्रिस्क्रिप्शन लिहा, असे आदेश डॉक्टरांना थेट कोर्टाकडून मिळाले आहेत. ओडिशाच्या उच्च न्यायालयानं हे आदेश दिले आहेत. एका व्यक्तीनं पत्नीची काळजी घेण्यासाठी जामिनासाठी अर्ज केला होता. पुरावा म्हणून संबंधित व्यक्तीनं डॉक्टरांनी दिलेलं प्रिस्क्रिप्शन कोर्टाला दाखवलं. त्यावर लिहिलेला मजकूर वाचणं अशक्य असल्याचं म्हणत कोर्टानं हा अनोखा आदेश दिला. यापुढे डॉक्टरांनी कॅपिटल अक्षरात सर्वांना समजेल अशा अक्षरात औषध लिहून द्यावी, असंही कोर्टानं म्हटलं.

World Corona Virus News

संबंधित बातम्या : 

Russia Corona Vaccine | राष्ट्रपती पुतिन यांच्या मुलीच्या प्रकृतीत सुधारणा, रशियाची कोरोना लस परिणामकारक?

Corona Vaccine | रशियाच्या राष्ट्रपतींनी स्वत:च्या मुलीलाच कोरोना लस टोचली, अमेरिका-ब्रिटनला लसीवर शंका

Non Stop LIVE Update
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...