कोल्हापूरच्या तालमीत पुन्हा घुमतोय शड्डू ठोकल्याचा आवाज
सरकारकडून हळूहळू अनलॉकला सुरुवात झाल्यानं अनेक कुस्तीगीर संघटनांकडून कुस्तीचे आखाडे सुरु करण्याची मागणी केली जात होती. अखेर प्रशासनानं कुस्तीच्या आखाड्यांनाही परवानगी दिली आहे. त्यामुळे पैलवान पुन्हा नव्या जोमानं लाल मातीत उतरले आहेत.
कोल्हापूर: कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून बंद असलेले कुस्तीचे आखाडे सुरु करण्यास राज्य सरकारनं परवानगी दिली आहे. त्यामुळे कोल्हापुरातील तालमीत आता शड्डू ठोकल्याचा आवाज पुन्हा घुमू लागला आहे. प्रशासनानं परवानगी दिल्यानंतर आखाड्याची विधीवत पूजा करुन पैलवानांनी सरावाला सुरुवात केली आहे. (Wrestling practice resumes in Kolhapur)
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक कठोर निर्णय घेण्यात आले. त्यामुळे सगळे व्यवहार ठप्प झाले. अनेक गोष्टी बंद कराव्या लागल्या. त्यात कुस्तीच्या आखाड्यांचाही समावेश होता. कुस्ती खेळताना पैलवानांचा एकमेकांशी येणाऱ्या संपर्कात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे सरकारनं कुस्तीवरही बंधन घातलं होतं. कुस्तीचे सामने, कुस्तीचा सराव बंद असल्यानं अनेक पैलवानांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता.
सरकारकडून हळूहळू अनलॉकला सुरुवात झाल्यानं अनेक कुस्तीगीर संघटनांकडून कुस्तीचे आखाडे सुरु करण्याची मागणी केली जात होती. अखेर प्रशासनानं कुस्तीच्या आखाड्यांनाही परवानगी दिली आहे. त्यामुळे पैलवान पुन्हा नव्या जोमानं लाल मातीत उतरले आहेत. या पैलवानांनी ठोकलेल्या शड्डूचा आवाज आता कोल्हापुरातील तालमीतून ऐकायला येऊ लागला आहे.
राष्ट्रीय तालीम संघाच्या अखत्यारीत येत असलेल्या मोतीबाग तालमीत आखाड्याचं पूजन करुन सरावाला सुरुवात करण्यात आली. सरकारने घालून दिलेल्या नियमांचं पालन करुन दोन सत्रात हे आखाडे सुरु करण्यात आले आहेत. सराव बंद असल्यानं गावी गेलेले पैलवानही आता पुन्हा आखाड्यात परतू लागले आहेत. सरकारने कुस्तीचे आखाडे सुरु केले. आता कुस्ती स्पर्धा सुरु करण्यासही परवानगी द्यावी, म्हणजे अनेक पैलवानांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल अशी मागणीही पैलवानांकडून करण्यात येत आहे.
अंबाबाई मंदिराचं स्ट्रक्चरल ऑडिट
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराचं इतिहासात पहिल्यांदाच स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येत आहे. यावेळी अनेक गंभीर बाबी समोर आल्याचा दावा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केलाय. देवस्थान समितीची पत्रकार परिषद आज पार पडली. या ऑडिटच्या अहवालानुसार मंदिराच्या छतावर 5 ते 6 फुटाचा कोबा करण्यात आला आहे. मात्र मूळ मंदिराच्या बांधकामात तो दिसून येत नाही, असं महेश जाधव यांनी सांगितलं आहे
संबंधित बातम्या:
मुंबई-पुण्यातून कोकणात, प. महाराष्ट्रात जाणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची कळकळीची विनंती
Wrestling practice resumes in Kolhapur