Lockdown Effect : रिडिंग न घेता महावितरणकडून अंदाजपंचे बिल, अव्वाच्या सव्वा बिलाने ग्राहक हैराण

लॉकडाऊननंतर एकाच वेळी भरमसाठ बील आल्याने नवी मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी नागरीक हैराण झाले आहेत (Wrong Electricity bills by MSEB in lockdown).

Lockdown Effect : रिडिंग न घेता महावितरणकडून अंदाजपंचे बिल, अव्वाच्या सव्वा बिलाने ग्राहक हैराण
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Jun 20, 2020 | 2:31 PM

नवी मुंबई : लॉकडाऊनच्या काळात मागील 3 महिन्यांपासून राज्यातील वीज ग्राहकांना विजेचे बील आले नाही. मात्र, आता एकाच वेळी भरमसाठ बील आल्याने नवी मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी नागरीक हैराण झाले आहेत (Wrong Electricity bills by MSEB in lockdown). कोरोनाच्या संकटात हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर अनेकांच्या पगारात कपात झाली आहे. असं असतानाच आता या अवाजवी बिलांनी ग्राहकांची चिंता वाढवली आहे.

लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मुंबईतील परप्रांतीय मजूर आपआपल्या गावी निघून गेले. उद्योगधंदेही ठप्प झाले. दरम्यान, कामच बंद असल्याने अनेक मुंबईकरांचं उत्पन्नाचं साधनंही हिरावलं गेलं. त्यातच आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता येताच वीज महामंडळाने पाठवलेल्या बिलांच्या रकमांनी ग्राहकांची पंचायत झाली आहे. वीज मंडळाचे कर्मचारी लॉकडाऊनमुळे घरोघरी वीज रिडींग घ्यायला गेलेच नाहीत. रिंडींग घेतले नसले, तरी महामंडळाने अगदी अंदाजपंचेच बील तयार करुन ग्राहकांना पाठवले आहेत.

लॉकडाऊननंतर आलेली ही बिलं अव्वाच्या सव्वा असल्याची ग्राहकांची तक्रार आहे. त्याचा मेळ आता कसा घालणार हा प्रश्‍न वीज ग्राहकांसमोरील मोठा प्रश्न आहे. आधी एखाद्या ग्राहकाला सरासरी 300 रुपये बील येत असेल, तर त्याला 700 रुपये बील आकारले गेले आहे. त्यामुळे ही बिलं कमी करण्यासाठी ग्राहकांना आता वीज मंडळाच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार आहेत. वीज ग्राहकांच्या याविषयी असंख्य तक्रारी आहेत. लॉकडाऊन शिथिल झाल्याने आता वीज मंडळाचे कर्मचारी विजेचे रिडींग घ्यायला येतील. ते बील देतील तेव्हाच 3 महिन्यांचे बिल इतके कसे आले हे कळणार आहे.

विशेष म्हणजे काही ग्राहकांनी अंदाजपंचे आलेली बिलंही ऑनलाईन पद्धतने भरलेली आहेत. मात्र, काही ग्राहकांना ऑनलाईन बील भरुनही दुसऱ्यांदा बिल देताना मागचे बील वजा करुन देण्यात आले नाही. उलट 2 महिन्यांचे बील आकारण्यात आले. या सर्व गोष्टींचा विचार करुन आता वीज मंडळाला बील आकारावे लागणार आहे. कोरोनामुळे आधीच संकटात सापडलेल्या ग्राहकांना आता 3 महिन्यांचे बील एकदम भरणेही शक्‍य नाही, असं मत ग्राहक व्यक्त करत आहेत.

हेही वाचा :

Tahawwur Rana arrest | मुंबई 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला अमेरिकेत अटक, भारतात आणण्याच्या हालचाली

कोरोनाविरोधी लढ्यासाठी ‘भैरवा’ पेंटिंगचा लिलाव, सदगुरुंचा पुढाकार

Melghat Superstition | आता 26 दिवसांच्या बाळाच्या पोटावर गरम सळईचे चटके, मेळघाटात अंधश्रद्धेचा कहर

Wrong Electricity bills by MSEB in lockdown

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.