सूर्यग्रहणावेळी बापलेक नदीत बुडाले, ‘फादर्स डे’लाच दुर्दैवी अपघात
यवतमाळमध्ये अग्रहारी पितापुत्र शनी मंदिरात पूजापाठ विधी करण्यासाठी गेले असताना हा अपघात घडला. (Yawatmal Father Son Drown in River)
यवतमाळ : सूर्यग्रहणावेळी विधी करताना झालेल्या अपघातात बापलेकाचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ‘फादर्स डे’लाच पितापुत्राचा करुण अंत झाल्याने यवतमाळमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. (Yawatmal Father Son Drown in River)
यवतमाळमधील घाटंजी तालुक्यातील बेलोरा रोडवरील वाघाडी नदीच्या काठावर ही घटना घडली. अग्रहारी पितापुत्र शनी मंदिरात पूजापाठ विधी करण्यासाठी गेले असताना हा अपघात घडला.
सूर्यग्रहण असल्याने अग्रहारी कुटुंबाने आज (रविवार 21 जून) पूजा आयोजित केली होती. पूजा पाठ आटोपल्यावर अग्रहारी कुटुंबातील सदस्य आंघोळ करण्यासाठी गेले. यावेळी 43 वर्षीय संजय शिवाप्रसाद अग्रहारी आणि त्यांचा 12 वर्षीय मुलगा आदित्य संजय अग्रहारी खोल पाण्यात बुडाले.
हेही वाचा : बाळा, पेरणी झाल्यावर टॅब घेऊन देतो, शेतकरी बापाचा शब्द टाळला, शाळकरी मुलाची आत्महत्या
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांनी घटनास्थळी भेट दिली. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे. बापलेकाच्या निधनाने अग्रहारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.
Fathers Day 2020 : ‘फादर्स डे’ का साजरा करतात? जाणून घ्या रंजक इतिहासhttps://t.co/DRnLASJ11V #FathersDaySpecial #fatherday2020 #FathersDay
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 21, 2020
(Yawatmal Father Son Drown in River)