Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्नाटकातही लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू होणार, येडियुरप्पांचे मंगळुरुमध्ये वक्तव्य

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी राज्यात लव्ह जिहादच्या संबंधातील घटना रोखण्यासाठी  कायदा करणार असल्याचे स्पष्ट केले. (Yediyurrappa said act against love jihad will be implement soon in Karnataka)

कर्नाटकातही लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू होणार, येडियुरप्पांचे मंगळुरुमध्ये वक्तव्य
Follow us
| Updated on: Nov 06, 2020 | 8:29 PM

बंगळुरू: भाजपशासित आणखी एका राज्याने लव्ह जिहाद विरोधात पाऊल उचलणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी राज्यात लव्ह जिहादच्या संबंधातील घटना रोखण्यासाठी  कायदा करणार असल्याचे स्पष्ट केले. कर्नाटकमध्ये लग्नासाठी होणाऱ्या धर्म परिवर्तनाच्या घटना रोखण्यासाठी कायदेतज्ज्ञांशी चर्चा सुरु असल्याचे त्यांनी सप्ष्ट केले.  उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा पाठोपाठ लव्ह जिहाद विरोधात कायदा करणारे कर्नाटक चौथे भाजपशासित राज्य ठरणार आहे. (Yediyurrappa said act against love jihad will be implement soon in Karnataka)

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मंगळवारी भाजपा राज्य कार्यकारिणीमध्ये संबोधित करताना लव्ह जिहाद संदर्भात कायदा करणार असल्याचे सप्ष्ट केले. “कर्नाटकमध्ये लव्ह जिहादच्या नावाखाली धर्म परिवर्तनाच्या घटना वाढल्या आहेत. यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. दुसऱ्या रांज्याविषयी ते काय करत आहेत मला माहित नाही. मात्र, कर्नाटकात आम्ही लव्ह जिहाद संपवणार आहोत.”, असं येडियुरप्पा म्हणाले.

येडियुरप्पा पुढे बोलताना म्हणाले की “राज्यात तरुण मुलींना प्रेम आणि पैशाचे प्रलोभन दाखवून त्यांचे धर्मांतर केले जात आहे. आम्ही याला गंभीरपणे घेत आहोत. लव्ह जिहाद संपवण्यासाठी कठोर पावलं उचलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.”

भाजपचे राष्ट्रीय महासचिव आणि पर्यटन मंत्री सी.टी. रवी यांनी लव्ह जिहादच्या विरोधत कडक कायदा निर्माण करण्याचे आव्हान केले. ‘राज्यात लग्नावेळी करण्यात येणाऱ्या धर्मांतरा विरोधात कायदा केला जाईल, आमच्या बहिणींच्या सन्मानाशी खेळ करणाऱ्यां विरोधात सरकार गप्प बसणार नाही’. यामध्ये सहभागी असणाऱ्यांवर लवकरच कारवाई केली जाईल, असं सी.टी.रवी म्हणाले.

कर्नाटक राज्याचे गृहमंत्री बसवराज बोमानी यांनी लव्ह जिहाद सामाजिक राक्षस असल्याचे म्हटले. ” राज्य सरकार लव्ह जिहाद विरोधात कायदा आणण्याचा विचार करत आहोत. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास करुन कर्नाटकमध्ये यासंबंधी कायदा केला जाईल.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका प्रकरणात लग्नासाठी धर्मांतर करणे योग्य नसल्याचं म्हटलं होते.

उत्तर प्रदेशातही लव्ह जिहाद विरोधात कायदा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लव्ह-जिहाद रोखण्यासाठी लवकरच कठोर कायदा करणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली आहे. या कायद्याद्वारे लव्ह-जिहादच्या प्रकारांना रोखण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. जौनपूरच्या मल्हनी विधानसभा मतदारसंघात एका जनसभेला संबोधित करताना योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा केली होती.

“आम्ही लव्ह जिहाद खपवून घेणार नाही. लव्ह जिहाद रोखण्यासाठी लवकरच प्रभावी आणि कठोर कायदा आणू. खोट्या नावाने आणि वेश बदलून मुलींची होणारी फसवणूक आम्ही थांबवल्याशिवाय राहणार नाही”, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

संबंधित बातम्या :

 ‘तनिष्क’वर कंगना भडकली, जाहिरातीतून लव्ह-जिहादला प्रोत्साहन दिल्याचा आरोप

Yogi Adityanath | उत्तर प्रदेशात लवकरच लव्ह जिहाद संदर्भात कायदा होणार – योगी आदित्यनाथ

(Yediyurrappa said act against love jihad will be implement soon in Karnataka)

शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न
शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न.
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप.
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज.
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात.
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?.
वणी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? भाविकांमध्ये ढकलाढकली, नेमकं काय घडल?
वणी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? भाविकांमध्ये ढकलाढकली, नेमकं काय घडल?.
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही...
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही....
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ.
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली.
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर.