योगी सरकारकडून लव जिहादविरोधात अध्यादेश जारी, दोषींना 10 वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद

उत्तर प्रदेश सरकारने लव जिहादविरोधात (Love Jihad) अध्यादेश जारी केला आहे. या अध्यादेशाचं नाव 'बेकायदेशीर धर्मांतरण अध्यादेश 2020' असं आहे.

योगी सरकारकडून लव जिहादविरोधात अध्यादेश जारी, दोषींना 10 वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद
Follow us
| Updated on: Nov 24, 2020 | 10:33 PM

लखनौ : उत्तर प्रदेश सरकारने लव जिहादविरोधात (Love Jihad) अध्यादेश जारी केला आहे. या अध्यादेशाचं नाव ‘बेकायदेशीर धर्मांतरण अध्यादेश 2020’ असं आहे. योगी सरकारच्या कॅबिनेटने आज (24 नोव्हेंबर) झालेल्या बैठकीत लव जिहादसह 21 प्रस्तावांना मंजूरी दिली आहे. या नव्या कायद्यात लव जिहाद प्रकरणांमध्ये पीडितेला आर्थिक मदतीची आणि दोषींना 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. आंतरधर्मीय विवाहाबाबत हा कायदा आहे (Yogi Government Ordinance against Love Jihad in UP).

उत्तर प्रदेश सरकारच्या या कायद्यानुसार आता आंतरधर्मीय विवाहासाठी 2 महिन्यांची नोटीस द्यावी लागणार आहे. तसेच जिल्हा दंडाधिकाऱ्यांची परवानगी देखील घ्यावी लागणार आहे. जर कोणत्याही तरुणाने आपलं नाव लपवून लग्न केलं तर त्याला 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी कॅबिनेट बैठकीची माहिती देताना सांगितलं, “राज्यात सातत्याने लव जिहादच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांना फसवून लग्न केलं जात आहे. तसेच त्यांचं धर्मांतरण केलं जात आहे. हे रोखण्यासाठी नवी व्यवस्था लागू करण्यात आली आहे.”

या नव्या कायद्यानुसार नाव आणि धर्म लपवून लग्न करणे आणि फसवणूक करण्यावर आळा बसेल, असा दावा मौर्या यांनी केलाय. जबरदस्तीने धर्मांतरण करणं चुकीचं आहे आणि आता या कायद्याप्रमाणे अशा दोषींवर कारवाई होईल, असंही त्यांनी सांगितलं.

अल्पवयीन प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा

उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री सिद्धार्थनाथ सिंह म्हणाले, “या अध्यादेशात नाव आणि धर्म लपवून लग्न करण्याला लव जिहाद म्हटलं आहे. या अध्यादेशांतर्गत जबरदस्तीने धर्मांतरण करण्यास भाग पाडणाऱ्याला 1-5 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा आहे. तसेच 15 हजार रुपयांचा दंड देखील भरावा लागेल. मुलगी अल्पवयीन असल्यास आणि SC/ST समाजातील तरुणी असल्यास धर्मांतरणास भाग पाडणाऱ्या दोषीला 3-10 वर्षाच्या शिक्षेची आणि 25 हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आलीय.

संबंधित बातम्या :

Love Jihad | जोडीदार निवडताना धर्म-लिंगाचे निर्बंध नाहीत, हायकोर्टाचा योगी सरकारला झटका

‘तरुणांचं बेरोजगारीवरुन लक्ष हटवण्यासाठी भाजपचं नाटक’, लव जिहादच्या मुद्द्यावर असदुद्दीन ओवेसी यांचं प्रत्युत्तर

एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला, तरीही महाविकास आघाडीचे सरकार आले आणि टिकले; शिवसेनेचा भाजपला टोला

व्हिडीओ पाहा :

Yogi Government Ordinance against Love Jihad in UP

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.